ई चलन दंड माफीचा सरकारला विसर, कोल्हापुरात प्रदीप राठोंडाचे आमरण उपोषण
schedule13 May 26 person by visibility 72 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्यातील खासगी बस वाहतुकीवरील ई चलन दंड माफीसंबधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली होती. मात्र त्यांच्याच नेतृत्वाखाली काम करणाऱ्या परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना मात्र याविषयाचा विसर पडल्याचे दिसत आहे. महायुती सरकारने तत्काळ ई चलन दंड माफ करावे, ई चलन रद्द करावे यासाठी कोल्हापुरातील खासगी बस वाहतूक व्यावसायिक प्रदीप राठोड यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. सोमवारपासून सुरू केलेल्या या आंदोलनाला विविध संस्था, संघटनांनी पाठिंबा दिला. प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे.
दरम्यान या आंदोलनाची तीव्रता वाढविण्यासाठी ‘जनआक्रोश स्टिकर’अभियान सुरू केले आहे. हे स्टिकर वाहनावर लावले जात आहेत. मागण्या मान्य झाल्याखेरीज आंदोलन मागे घेणार नाही असा आक्रमक पवित्रा राठोड यांनी घेतला आहे. राठोड यांच्या आंदोलनाला राजकीय पक्ष, संघटना प्रतिनिधींनी मंगळवारी पाठिंबा दिला. भाजप महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, सुभाष जाधव , किरण पडवळ यांनी पाठिंबा दिला. आरटीओ ऑफिस परिसरातील केबिनधारक व व्यावसायिक प्रतिनिधींनीही कामावर बहिष्कार टाकत आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. उदय लाड, संदीप बहिरशेठ, प्रकाश हुलस्वार, प्रवीण चिनोरे, संग्राम कदम, अजित पसारे, सुनील मोरे, पंकज त्रिपाटी, नितीन खाबडे, विशाल सोनुले आदींनी आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी कॉम्रेड सतीश कांबळे व अन्य व्यावसायिक उपस्थित होते.