Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जनसुराज्यकडून गोकुळसाठी अमरसिंह पाटील, करणसिंह गायकवाड, सिदगोंडा पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल अजून लोकसभा - राज्यसभा- आमदारकी- विधानपरिषद शिल्लक , बघू या काय काय होते: अरुण डोंगळेविश्वास पाटील यांचे दोन गटातून अर्ज दाखल ! सुरेश देसाई, सुरेश कुराडेंनी भरला उमेदवारी अर्ज !!कलाश्री महोत्सवात भाव - भक्ती-नाट्य संगीताची सुरेल मैफिलरमेश मस्करांच्या कालावधीत पैसे खाण्याची टक्केवारी वाढली, पदोन्नतीवरून महापालिकेत हंगामा ! सत्ताधारी- विरोधक आमनेसामने !!गणेशभक्तांसाठी खुशखबर, घरगुती गणेशोत्सव देखावा स्पर्धाक्रिडाई कोल्हापूरतर्फे राष्ट्रीय अभियंता दिननृत्यांगना वर्षा  खाडिलकर, निधी आलासेंच्या नृत्याविष्काराने रसिक-प्रेक्षक मंत्रमुग्धगोकुळच्या निवडणुकीसाठी नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील-चुयेकर,  बाळासाहेब खाडेंचे अर्ज दाखलमुश्रीफांनी जाहीर केलेल्या गोकुळच्या ठराव संख्येवरून भाजपच्या नेत्यांना मिरचीचा ठसका का लागला ? युवराज पाटील

जाहिरात

 

कलाश्री महोत्सवात भाव - भक्ती-नाट्य संगीताची सुरेल मैफिल

schedule16 Sep 26 person by visibility 54 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी  :  भाव, भक्ती,नाट्य संगीताच्या सुरेल मैफिलीने कलाश्री महोत्सव रंगला.  येथील दि न्यू एज्युकेशन सोसायटीतर्फे राम गणेश गडकरी सभागृहात महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी,  कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशाच्या आरतीने झाली.

" रसिक रंग" या कार्यक्रमांतर्गत सुप्रसिद्ध गायिका डॉ .स्वरूपा बर्वे -घुले व डॉ.ओंकार बर्वे या दोघा भावंडांनी   भारतीय उपशास्त्रीय संगीतातील चैती, खोरी, कजरी ,नाट्य अभंग व भावगीत या प्रकारातील   तेजोमय नादब्रह्म हे, हृदयाच्या तालावर, बगळ्यांची माळ फुले , चैतर मासे आयो घर सजना , देवाघरचे ज्ञात कुणाला , हे सुरांनो चंद्र व्हा , माझे जीवन गाणे , बरसन लागी बदरीया , दे हाता शरणागता, शब्दावाचून कळले सारे , मी राधिका कानडा राजा पंढरीचा  अवघा रंग एक झाला ही गाणी सादर करून रसिकांची  मने जिंकली. त्यांना, साथ संगत आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार स्वरूप दिवाण (हार्मोनियम) शिवाजी सुतार ( सिंथे सायजर) केदार गुळवणी (व्हायोलिन) प्रशांत देसाई (तबला) यांनी दिली.तर या कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिद्ध निवेदक मनीष आपटे यांनी केले.

सत्कार संस्थेचे  माजी अध्यक्ष विनोदकुमार लोहिया व विद्यमान अध्यक्ष निर्मल लोहिया यांच्या हस्ते डॉ. विवेकानंद कुलकर्णी, रेखा कुलकर्णी, पंडित विनोद डिग्रजकर, राजप्रसाद धर्माधिकारी, श्रीपाद रामदासी,  मकरंद देशमुख, समीर देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष- नितीन वाडीकर, नेमचंद  संघवी , प्रशांत लोहिया,  सचिव प्राचार्य प्रभाकर  हेरवाडे, सहसचिव एस .एस. चव्हाण, उद्योगपती किरण पाटील, डॉ. सुरेश देशपांडे, डॉ.ज. ल. नागावकर, गायक प्रल्हाद जाधव, अभय देशपांडे , डॉ. शीतल धर्माधिकारी, सुजाता लोहिया, मनीषा वाडीकर ,अभय देशपांडे, सतीश कुलकर्णी, राहुल चिकोडे आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes