Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
संस्थेच्या नावांनी बनावट नियुक्ती आदेश, पाच जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखलविवेकानंद कॉलेजच्या प्राचार्यपदी डॉ. मिलिंद हुजरेराज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून कोरे डिप्लोमाला अतिशय उत्कृष्ट मानांकनगोकुळ जपू या - गोकुळ वाढवू या, डॉ. युवराज येंडुरेंच्या नेतृत्वाखालील आत्मक्लेश आंदोलनात शेतकरीही सहभागी  जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी बाजीराव पाटीलकोल्हापूर - सांगलीसह चार जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांची विशेष तपासणी; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईआषाढी वारीसाठी जिल्हा परिषदेचे वैद्यकीय मदत पथक सज्ज, औषध किटसह पथक आळंदीसाठी रवाना!शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात इंडक्शन प्रोग्राम, विद्यार्थिनींच्या कलागुणांना लाभले व्यासपीठमहाराष्ट्र चेंबरच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा दिमाखात, मुख्यमंत्र्यांनी केले गाव तिथे उद्योजक उपक्रमाचे कौतुक श्री आनंदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये इंजिनिअरिंग प्रवेशासाठी मोफत सुविधा केंद्र

जाहिरात

 

गव्हर्मेंट सर्व्हंटस बँकेच्या अध्यक्षपदी रवींद्र पंदारे, उपाध्यक्षपदी विलासराव कुरणे

schedule07 Jul 26 person by visibility 44 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी: राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी रवींद्र पंदारे यांची तर उपाध्यक्षपदी विलासराव कुरणे यांची बिनविरोध निवड झाली. उपनिबंधक डॉक्टर प्रिया दळणर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या निवडी झाल्या. रोहित बांदिवडेकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. मुख्य कार्यकारी अधिकारी रुपेश पाटोळे यांनी निवडीची रूपरेषा सांगितली. अध्यक्षपदासाठी पंदारे यांचे नाव संचालक मधुकर पाटील यांनी सुचवले. संचालक शशिकांत तिवले यांनी त्यास अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी कुरणे यांचे नाव संचालक अतुल जाधव यांनी सुचवले तर संचालक बांदिवडेकर यांनी अनुमोदन दिले. दोन्ही पदाकरिता प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल झाल्याने पंदारे व कुरणे यांच्या निवडी बिनविरोध झाल्या. यावेळी बँकेचे संचालक रमेश घाटगे, सदानंद घाटगे, अजित पाटील,  हेमा पाटील, मनोज रेणके, संजय खोत, किशोर पवार , अरविंद आयरे, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते .अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बोलताना रवींद्र पंदारे  म्हणाले, " संचालक व सभासदांनी माझ्यावर जो विश्वास दाखवेल आहे तो सार्थ ठरवू. सर्व संचालकांना सोबत घेऊन बँकेच्या प्रगतीचा आलेख आणखी उंचावत नेऊ."

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes