Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महायुतीत संशयकल्लोळ, ठरावधारकांचे व्हेरिफिकेशन ! मंत्र्यांच्यासमोर हायहोल्टेज ड्रामा अन् डॅमेज कंट्रोलसाठी नेत्यांची धाव !!शिक्षक बँकेची सभा गोंधळाची, हमरीतुमरी -अंगावर धावून जाण्याचा प्रकार ! संचालकांची संख्या १७ वरुन २१ करण्याचा ठराव मंजूर !!गडहिंग्लजमध्ये मुख्याध्यापक संघाची नव्याने इमारत उभारणार, मुख्याध्यापक संघाच्या सर्वसाधारण सभेत निर्णयठरावधारकांच्या व्हेरिफिकेशनवरून भाजप- राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्यामध्ये जोरदार वादावादी, मंत्र्यांची धावाधावमहायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटेना, नेते मंडळांची पुन्हा बैठक सुरूशिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा कोल्हापुरात उत्साहात शुभारंभशिक्षक बँकेला तीन कोटीहून अधिक नफा, आठ टक्के लाभांश ! व्यवसाय वृद्धीसाठी संचालक संख्या वाढीचा प्रस्ताव ! !सत्ताधारी संचालकांनी सभासदांची दिशाभूल थांबवावी, गेल्या चार वर्षाची कामगिरी मांडावी ! दोन अंकी लाभांश, एक अंकी व्याजदर केव्हा देणार ते सांगा !!डॉ.डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये गौराई खेळ' स्पर्धा उत्साहातशिवराजे स्पोर्ट्सतर्फे गरीब-होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

जाहिरात

 

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा कोल्हापुरात उत्साहात शुभारंभ

schedule27 Sep 26 person by visibility 3325 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी  : अमाप उत्साह आणि उत्स्फूर्त प्रतिसादाच्या वातावरणात कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो शिक्षक मतदारांच्या उपस्थितीत पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या समाधीस्थळी हा शुभारंभ पार पडला. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित शिक्षकांनी कौस्तुभ गावडे यांच्या शिक्षकहिताच्या भूमिकेला उत्स्फूर्त पाठिंबा व्यक्त केला.
यावेळी प्राचार्य डॉ. अशोकराव जगताप, विभागप्रमुख डॉ. श्रीराम साळुंखे, प्राचार्या डॉ. श्रृती जोशी, प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील, डॉ. कविता तिवडे, डॉ. आर. वाय. पाटील,  हितेंद्र साळुंखे, श महेश साळुंखे यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी  मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
शिक्षक मतदारांच्या नोंदणीचे नियोजन, पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांतील शिक्षकांशी असलेला थेट संपर्क आणि शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने केलेले काम यामुळे  गावडे यांना शिक्षकांचा विश्वास व पाठिंबा मिळत असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.
शिक्षकांच्या प्रश्नांना प्रभावीपणे मांडण्यासाठी सातत्यपूर्ण संवाद, शिक्षकांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यांच्या हक्कांसाठी पाठपुरावा करण्याची भूमिका या प्रचाराच्या केंद्रस्थानी असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes