महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटेना, नेते मंडळांची पुन्हा बैठक सुरू
schedule27 Sep 26 person by visibility 142 category
rमहाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : गोकुळच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यालय ,हॉटेल पॅवेलियन, रेसिडेन्सी क्लब अशा विविध ठिकाणी दिवसभर खलबते सुरू होती. दुपारी साडेचार नंतर हॉटेल पॅव्हेलियन येते रविवारी महायुतीच्या नेते मंडळी मध्ये पुन्हा एकदा जागा वाटप संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे, आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार के पी पाटील, संजय घाटगे, शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक सुरू झाले आहे. गोकुळचे माजी चेअरमन, संचालक, महायुतीतील इच्छुक उमेदवार व पदाधिकाऱ्यांनी हॉटेल पॅवेलियन येथे गर्दी केली आहे.