Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महायुतीत संशयकल्लोळ, ठरावधारकांचे व्हेरिफिकेशन ! मंत्र्यांच्यासमोर हायहोल्टेज ड्रामा अन् डॅमेज कंट्रोलसाठी नेत्यांची धाव !!शिक्षक बँकेची सभा गोंधळाची, हमरीतुमरी -अंगावर धावून जाण्याचा प्रकार ! संचालकांची संख्या १७ वरुन २१ करण्याचा ठराव मंजूर !!गडहिंग्लजमध्ये मुख्याध्यापक संघाची नव्याने इमारत उभारणार, मुख्याध्यापक संघाच्या सर्वसाधारण सभेत निर्णयठरावधारकांच्या व्हेरिफिकेशनवरून भाजप- राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्यामध्ये जोरदार वादावादी, मंत्र्यांची धावाधावमहायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटेना, नेते मंडळांची पुन्हा बैठक सुरूशिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा कोल्हापुरात उत्साहात शुभारंभशिक्षक बँकेला तीन कोटीहून अधिक नफा, आठ टक्के लाभांश ! व्यवसाय वृद्धीसाठी संचालक संख्या वाढीचा प्रस्ताव ! !सत्ताधारी संचालकांनी सभासदांची दिशाभूल थांबवावी, गेल्या चार वर्षाची कामगिरी मांडावी ! दोन अंकी लाभांश, एक अंकी व्याजदर केव्हा देणार ते सांगा !!डॉ.डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये गौराई खेळ' स्पर्धा उत्साहातशिवराजे स्पोर्ट्सतर्फे गरीब-होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

जाहिरात

 

गडहिंग्लजमध्ये मुख्याध्यापक संघाची नव्याने इमारत उभारणार, मुख्याध्यापक संघाच्या सर्वसाधारण सभेत निर्णय

schedule27 Sep 26 person by visibility 63 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी: गडहिंग्लज येथे मुख्याध्यापक संघाची नव्याने इमारत उभारण्याचा निर्णय  जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची ८२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष राहुल पवार यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. .
सभेच्या प्रारंभी उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दुखवटा ठराव मांडला. राहुल पोवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सचिव आर. वाय. पाटील यांनी सभेची नोटीस वाचन केले, तर सहसचिव श्रीकांत हरी पाटील यांनी मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले. सूत्रसंचालन एच. वाय. शिंदे यांनी केले. उपाध्यक्ष मिलिंद पांगिरेकर यांनी आभार मानले.
अनाथ विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी असलेल्या निधीची रक्कम वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मंजुरीशिवाय काढण्यात येऊ नये, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध स्पर्धा, शैक्षणिक उपक्रम व मार्गदर्शनपर कार्यक्रम राबविण्याची गरज व्यक्त करण्यात आली. प्रश्नपत्रिका बिल आणि शिक्षकांच्या जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न यावरही चर्चा करण्यात आली. 
 आशियाई क्रीडा स्पर्धेत एअर रायफल स्पर्धेत रौप्यपदकप्राप्त केल्याबद्दल सोनम उत्तम मस्कर (पुष्पनगर) व हॉकी स्पर्धेत सानिका माने (नुल) यांच्या यशाबद्दल सभेत विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी राहुल पोवार, मिलिंद पांगिरेकर, रवींद्र मोरे आर. वाय. पाटील, श्रीकांत  पाटील, ऑडिटर संजय पाटील, बी. जी. बोराडे,   संचालक  एस. के. पाटील,जयसिंग पाटील, रामचंद्र  शिंदे, संजय  देवेकर, सुनील पाटील, पी. बी. भारमल, जी. एस. पाटील, आनंदा वारंग, माजीद पटेल, हेमंत धनवडे,  युवराज पाटील, बसवराज वस्त्रद, एम. जी. पाटील, डी. एस. यरुडकर, पी. एस. पाटील, प्रकाश पाटील, मनीषा यादव, हर्षदा गोसावी यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. एच. वाय. शिंदे यांनी सूत्रसंचालन   केले. उपाध्यक्ष मिलिंद पांगिरेकर यांनी आभार मानले.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes