Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता -आरोग्याला प्राधान्य देण्याची गरज :  शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंतड्रायव्हर सीटवर खासदार, बसमध्ये नगरसेवक ! पीएमईच्या नव्या वाहनातून फेरफटका !!ब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे चार ऑगस्टपासून संतांचे संगती निरुपण सोहळा राज्यव्यापी व्यापारी परिषदेला राज्यातून प्रतिनिधी उपस्थित राहणारमहाराष्ट्रातील सामाजिक चळवळीला अण्‍णा भाऊ साठे यांच्‍या साहित्‍याने लेखनबळ - संजय कृष्णाजी पाटील केआयटीत जागतिक दर्जाचे डिझाइन सॉफ्टवेअर विद्यार्थ्यांसाठी उपलब्धकरुन दाखविलं…केएमटीला मिळतोय नवा चेहरा, सेवेचा परिघ विस्तारणार! रोजंदारी कर्मचाऱ्यांनाही कायमची शाश्वती !! २७ कोटीचा घरफाळा थकीत, महापालिकेकडून स्टार बझारची इमारत सील ! सर्कीट बेंचकडून कारवाईला स्थगिती ! !महिला कारागिरांच्या हस्तनिर्मित वस्तूंना हक्काचे व्यासपीठ, लक्ष्मीपुरीत साकारले कलापुरीचे कलादालनतर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर रंगकर्मी - कलाकारांचा बहिष्कार, दौऱ्यात काळे झेंडे दाखविणार

जाहिरात

 

केआयटीत जागतिक दर्जाचे डिझाइन सॉफ्टवेअर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध

schedule01 Aug 26 person by visibility 35 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : तांत्रिक शिक्षणाला जागतिक दर्जाची दिशा देणारा महत्त्वाचा टप्पा केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाने गाठला आहे. जागतिक सॉफ्टवेअर कंपनी बेंटली सिस्टीम्सच्या सहकार्याने ‘बेंटली सेंटर ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन’ या अत्याधुनिक सेंटरची स्थापना करण्यात आली. या सेंटरमुळे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील इन्फ्रास्ट्रक्चर डिझाइन तंत्रज्ञान आणि उद्योगात वापरले जाणारे अत्याधुनिक सॉफ्टवेअरचे प्रत्यक्ष प्रशिक्षण कॅम्पसमध्येच मिळणार आहे.

सेंटरचे उद्घाटन बेंटली सिस्टीम्सचे व्हाइस प्रेसिडेंट  राहुल पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे सचिव दीपक चौगुले, विश्वस्त भरत पाटील, सुनील कुलकर्णी, संचालक डॉ. मोहन वनरोट्टी, बेंटलीच्या सिनियर मॅनेजर श्रीमती मोनिका जाधव, उपस्थित होते. यावेळी बोलताना सचिव चौगुले म्हणाले, "विद्यार्थ्यांना केवळ पदवी नव्हे, तर उद्योगाला अपेक्षित कौशल्ये देणे ही काळाची गरज आहे. या सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थी जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाशी जोडले जातील आणि रोजगाराच्या नव्या संधी त्यांच्यासाठी खुल्या होतील."  

श्रीमती मोनिका जाधव यांनी बेंटली एज्युकेशन उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, जगभरातील पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये वापरले जाणारे अत्याधुनिक बेंटली इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनियरिंग सॉफ्टवेअर आता केआयटीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिकण्याची संधी मिळणार आहे. उद्योग आणि शिक्षण यांच्यातील दरी कमी करून विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. बेंटली सिस्टीम्सचे व्हाइस प्रेसिडेंट श्री. राहुल पाटील यांनी केआयटीच्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे कौतुक करताना सांगितले, "भविष्यातील इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्र डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित असेल. त्यामुळे सिव्हिल अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी प्रोग्रामिंग आणि डिजिटल कौशल्ये आत्मसात करणे अत्यावश्यक आहे."संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी सांगितले की, या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत १० हून अधिक विद्यार्थी आणि प्राध्यापकांना बेंटलीच्या अत्याधुनिक सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. 

सेंटरचे प्रमुख डॉ. रोहन नलवडे यांनी पुढील टप्प्यात केआयटीमध्ये ‘डिजिटल ट्विन कॅम्पस’ विकसित करणार असल्याची माहिती दिली. यामुळे संपूर्ण कॅम्पसचे थ्रीडी डिजिटल मॉडेल तयार होऊन नियोजन, देखभाल आणि व्यवस्थापन अधिक स्मार्ट, अचूक आणि कार्यक्षम होणार आहे. या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली, उपाध्यक्ष सचिन मेनन व विश्वस्तांचे प्रोत्साहन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes