Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळ निवडणुकीतील सर्वाधिक लक्षवेधी लढत !  नविद मुश्रीफ विरुद्ध शशिकांत खोत!!जुनी पेन्शन योजनेसह शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी प्रभावी पाठपुरावा करणार - कौस्तुभ गावडेपुणे पदवीधरमध्ये  उमेदवारांची भाऊगर्दी, ३५ अपक्ष !  महायुतीकडून स्मिता जाधव,  महाविकासच्या हर्षदा देशमुख, शिवसेना ठाकरे पक्षाकडून मोदी ! !प्राथमिक शिक्षक समितीतर्फे सोमवारी पंचायत समितीसमोर धरणे आंदोलनशारदीय नवरात्रोत्सवानिमित्त अंबाबाईची नऊ दिवस विविध रुपात पूजाशिक्षक मतदारसंघात बहुरंगी लढत ! सात पक्षीय उमेदवार, २३ अपक्ष रिंगणात !जागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत शिवाजी विद्यापीठाचे २३ संशोधकजज डडजिल्हास्तरीय पाककृती स्पर्धेतून पोषण विषयक जनजागृती;  वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विभागाचे कौतुकसर्वात तरुण आमदार म्हणून कौस्तुभ गावडे यांना विधान परिषदेवर पाठवू ; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

जाहिरात

 

जुनी पेन्शन योजनेसह शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी प्रभावी पाठपुरावा करणार - कौस्तुभ गावडे

schedule10 Oct 26 person by visibility 69 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष-महायुतीचे उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाने जाहीर पाठिंबा दिला. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, खासदार धैर्यशील पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार भीमराव तापकीर, संजय जगताप, निवडणूक सहप्रमुख डॉ. प्रशम कोल्हे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कुंद यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पाठिंबा जाहीर करण्यात आला.

नागपूरहून आलेले श्री. कडू  यांनी, शिक्षक मित्र कौस्तुभ गावडे हे फक्त पुणे विभाग शिक्षक मतदार संघापुरते मर्यादित नसून ते जुनी पेन्शन समस्येबाबत संपूर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व करीत आहेत. त्यामुळे ते नक्कीच जुनी पेन्शनसाठी कार्यरत राहतील, असा आशावाद व्यक्त केला.याप्रसंगी सुभाष माने, तानाजी माने, नंदकुमार सागर, प्रसाद गायकवाड, संजयकुमार झांबरे, सचिन नलवडे, दत्ता पाटील, बाबा पाटील, संदेश राऊत, विजय येवले, सुधाकर जगदाळे, शशिकांत शिंदे, रामचंद्र मोहिते, भरत मोजर , देविदास कठाळे आणि दत्तात्रय घुगरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे म्हणाले, “जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सातत्याने लढा देणाऱ्या शिक्षक आणि कर्मचारी बांधवांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला, ही माझ्यासाठी आनंदाची बाब असून त्याचबरोबर मोठी जबाबदारीही आहे. त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन.''

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes