शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त अंबाबाईची नऊ दिवस विविध रुपात पूजा
schedule10 Oct 26 person by visibility 45 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त ११ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत करवीरनिवासिनी अंबाबाईची विविध रुपात पूजा बांधण्यात येणार आहे. श्री करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळातर्फे या अलंकार पूजा यासंदर्भातील माहिती दिली आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेला ११ ऑक्टोबर रोजी श्री नंदादेवी, १२ ऑक्टोबरला श्री सर्वस्याद्या, तेरा ऑक्टोबरला श्री भीमादेवी, १४ ऑक्टोबरला श्री कात्यायनी, पंधरा तारखेला गजारुढ अंबारीतील पूजा, सोळा तारखेला देवी स्कंदमाता, सतरा तारखेला देवी वैष्णवी, १८ तारखेला त्रिगुणात्मका महालक्ष्मी, अष्टमीला अर्थात १९ ऑक्टोबरला महिषासूरमर्दिनी रुपात पूजा बांधण्यात येणार आहे. अश्विन शुद्ध नवमीला २० ऑक्टोबरला अश्व रुथारुढ पूजा बांधण्यात येणार आहे.