प्राथमिक शिक्षक समितीतर्फे सोमवारी पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन
schedule10 Oct 26 person by visibility 229 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, कोल्हापूर शाखेतर्फे सोमवारी, १२ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ‘गाव तिथे शाळा आणि वर्ग तिथे शिक्षक’ ही प्रमुख मागणी आहे. तसेच मुंबई येथील आझाद मैदान येथे सुरू असलेल्या ‘शिक्षण वाचवा, शाळा वाचवा’ या आंदोलनाला शिक्षक समितीचा पाठिंबा आहे. तसेच शिक्षकांना अशैक्षणिक कामांपासून मुक्त करावे या मागणीसाठी आंदोलन पुकारले आहे. अशी माहिती समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर यांनी दिली. याप्रसंगी बाबुराव परीट, शरद केनवडे, संगीता अस्वले, शुभांगी माळी आदी उपस्थित होते.