Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिक्षक संघातर्फे राजमाता जिजाऊ आदर्श महिला शिक्षक पुरस्कार जाहीर, २९ मार्चला पुरस्कार वितरणगोकुळकडून महिला दूध उत्पादकांसाठी नारी सन्मान विमा योजना खासगी प्राथमिकतर्फे मालवणमध्ये महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम विद्यार्थिनीशी अश्लील  वर्तन, प्राध्यापक निलंबित ! चौकशी समितीची स्थापना डीवाय पाटील अभिमत विद्यापीठाचा मंगळवारी चौदावा दीक्षांत समारंभकोल्हापूरला राज्याच्या टॉप १० शहरांत स्थान मिळवून देवू : आमदार राजेश क्षीरसागरगुरु-शिष्य प्रदर्शनाचा १५ रोजी प्रारंभ ! दुर्गा आजगावकर यांना युवा कलाकार पुरस्कार!!जिल्हा परिषद काँग्रेसच्या गटनेतेपदी एकनाथ पाटीलमहायुती म्हणून लढणार, पण नेतृत्व कोणाकडे ? भाजप- राष्ट्रवादीत चढाओढ!!राष्ट्रवादीची वेळ चुकली, शिवसेनेचा परिवहन सभापतीवर निशाणा

जाहिरात

 

कोल्हापूरला राज्याच्या टॉप १० शहरांत स्थान मिळवून देवू : आमदार राजेश क्षीरसागर

schedule07 Mar 26 person by visibility 194 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर :  येत्या काळात कोल्हापूरात औद्योगिक, व्यापार आणि पर्यटन क्षेत्राची नवी क्रांती दिसून येईल. यासह इतर महत्वकांक्षी प्रकल्पाच्या निर्मितीतून कोल्हापूरला राज्याच्या टॉप १० शहरांत स्थान मिळवून देवू, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.

कोल्हापूरात मंजूर झालेल्या आय.टी.पार्क व छत्रपती शाहू मिल्सच्या जागेत मंजूर स्मारक व टेक्स्टाईल टुरिझम हब बाबत माहिती देण्याकरिता शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.कोल्हापूर शहरातील शेंडापार्क परिसरात आयटी क्षेत्राचा विकास साधण्यासाठी ३४.३६ हेक्टर शासकीय जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) देण्यास राज्य मंत्रिमंडळाने ५ मार्च २०२६ रोजी मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या ठिकाणी अत्याधुनिक सुविधा असलेला आयटी पार्क उभारण्याची योजना आहे.

 दरम्यान शाहू मिले येथील जागेत  राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याला व विचारांना साजेसे स्मारक आणि महाराजांच्या नावे टेक्स्टाईल टुरिझम हब (कापड पर्यटन केंद्र) निर्माण करण्यास वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी तत्वत: मंजुरी देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये राजर्षी शाहू महाराज आणि करवीरसंस्थापिका छत्रपती ताराराणी यांच्या जाज्वल इतिहासाची साक्ष देणारे स्मारक व संग्रहालय, कापड उद्योगाचा इतिहास, जुनी यंत्रसामग्री आणि कापड विणण्याच्या पद्धती दर्शविणारे शाहू मिल म्युझियम, टेक्सटाइल इंजिनिअरिंग कॉलेज, इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, इस्टिट्यूट ऑफ फॅब्रिक डिझाइन, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी अत्याधुनिक १००० ते १२०० आसन क्षमता असणारे ऑडिटोरीयम, संगीत विद्यालय, मिल्स शेजारी असणाऱ्या कोटीतीर्थ तलावाकडील बाजूचे सुशोभिकरण करून त्याठिकाणी पर्यटन वृद्धीच्या दृष्टीने अॅम्युझमेंट पार्क आदींचा समावेश करण्याच्या सूचना मंत्रालयीन बैठकीत दिल्या आहेत. जेणेकरून या स्मारकाद्वारे राजर्षी शाहू महाराजांचे शिक्षण, उद्योग, कला क्षेत्राच्या उन्नतीसाठी असलेला उद्देश जपला जाईल. 

या पत्रकार परिषदेस शिवसेना उपनेत्या माजी आमदार जयश्री जाधव, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, नगरसेवक रत्नेश शिरोळकर, नगरसेवक सत्यजित जाधव,  स्वरूप कदम, नगरसेवक वैभव माने,  प्रसाद चव्हाण, नगरसेविका मंगल साळोखे, कौसर बागवान,  अर्चना पागर, नेपोलीयन सोनुले, परिवहन सदस्य रोहन अतिग्रे, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष दीपक चव्हाण, शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, शहरप्रमुख रणजित जाधव, सुनील जाधव, इंद्रजित आडगुळे, अनिल पाटील, कमलाकर जगदाळे, हर्षल सुर्वे, अरविंद मेढे, दुर्गेश लिंग्रस, उदय भोसले, राज जाधव, विनय वाणी, प्रभू गायकवाड, राहुल चव्हाण आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes