Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिक्षक संघातर्फे राजमाता जिजाऊ आदर्श महिला शिक्षक पुरस्कार जाहीर, २९ मार्चला पुरस्कार वितरणगोकुळकडून महिला दूध उत्पादकांसाठी नारी सन्मान विमा योजना खासगी प्राथमिकतर्फे मालवणमध्ये महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम विद्यार्थिनीशी अश्लील  वर्तन, प्राध्यापक निलंबित ! चौकशी समितीची स्थापना डीवाय पाटील अभिमत विद्यापीठाचा मंगळवारी चौदावा दीक्षांत समारंभकोल्हापूरला राज्याच्या टॉप १० शहरांत स्थान मिळवून देवू : आमदार राजेश क्षीरसागरगुरु-शिष्य प्रदर्शनाचा १५ रोजी प्रारंभ ! दुर्गा आजगावकर यांना युवा कलाकार पुरस्कार!!जिल्हा परिषद काँग्रेसच्या गटनेतेपदी एकनाथ पाटीलमहायुती म्हणून लढणार, पण नेतृत्व कोणाकडे ? भाजप- राष्ट्रवादीत चढाओढ!!राष्ट्रवादीची वेळ चुकली, शिवसेनेचा परिवहन सभापतीवर निशाणा

जाहिरात

 

जिल्हा परिषद काँग्रेसच्या गटनेतेपदी एकनाथ पाटील

schedule07 Mar 26 person by visibility 38 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या गटनेतेपदी एकनाथ पाटील यांची निवड करण्यात आली. तसेच राधानगरी पंचायत समितीमध्ये काँग्रेसच्या गटनेतेपदी मोहन पाटील, करवीर पंचायत समितीत काँग्रेसच्या गटनेतेपदी रवींद्र पाटील तर गगनबावडा पंचायत समितीतील गटनेतेपदी राजेश पाटील यांची निवड झाली.

अजिंक्यतारा कार्यालय येथे या निवडी पार पडल्या. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार या निवडी झाल्या. गटनेतेपदाची निवड प्रक्रिया झाल्यानंतर सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे गटनेतेपदाची नोंदणी केली. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर बोलताना जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील म्हणाले, ‘आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या गटनेतेपदी काम करण्याची संधी दिली. माझ्यावर पक्षाने जो विश्वास व्यक्त केला आहे, तो चांगल्या पद्धतीने काम करुन सार्थ ठरवेन. सर्व सदस्यांना एकत्र आणून ग्रामीण भागातील विकासाचे प्रश्न मार्गी लावू.’ गोकुळचे संचालक बाबासो चौगुले, बयाजी शेळके, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, बिद्री कारखान्याचे संचालक राहुल देसाई आदींच्या उपस्थितीमध्ये गटनेतेपदाच्या निवडी झाल्या. याप्रसंगी कोल्हापूर महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजीत बोंद्रे यांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तायशेटे, रेश्मा देसाई, रसिका पाटील, सुदर्शन खोत, सोनाली सावंत, सागर धुंदरे, संयोगिता मोरे, संग्राम पाटील, अॅड. राहुल आवळे, सोनाली पाटील, अनिता कांबळे, वंदना जाधव, अश्विनी चौगुले, लता माने, अमर कांबळे, मोहन पाटील, आर. वाय. पाटील, अनिल म्हेत्रे, विश्वनाथ पाटील, संदीप पाटील, डॉ. संदीप हजारे, उमा पाटील, शुंभागी संकपाळ, छाया देसाई, अमृता पाटील आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes