Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिक्षक संघातर्फे राजमाता जिजाऊ आदर्श महिला शिक्षक पुरस्कार जाहीर, २९ मार्चला पुरस्कार वितरणगोकुळकडून महिला दूध उत्पादकांसाठी नारी सन्मान विमा योजना खासगी प्राथमिकतर्फे मालवणमध्ये महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम विद्यार्थिनीशी अश्लील  वर्तन, प्राध्यापक निलंबित ! चौकशी समितीची स्थापना डीवाय पाटील अभिमत विद्यापीठाचा मंगळवारी चौदावा दीक्षांत समारंभकोल्हापूरला राज्याच्या टॉप १० शहरांत स्थान मिळवून देवू : आमदार राजेश क्षीरसागरगुरु-शिष्य प्रदर्शनाचा १५ रोजी प्रारंभ ! दुर्गा आजगावकर यांना युवा कलाकार पुरस्कार!!जिल्हा परिषद काँग्रेसच्या गटनेतेपदी एकनाथ पाटीलमहायुती म्हणून लढणार, पण नेतृत्व कोणाकडे ? भाजप- राष्ट्रवादीत चढाओढ!!राष्ट्रवादीची वेळ चुकली, शिवसेनेचा परिवहन सभापतीवर निशाणा

जाहिरात

 

खासगी प्राथमिकतर्फे मालवणमध्ये महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

schedule07 Mar 26 person by visibility 58 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचा यावर्षीचा जागतिक महिला दिन "बॅ . नाथ पै सेवांगंण मालवण "येथे ७ व ८ मार्च २०२६ रोजी साजरा होणार आहे. ७ मार्चला सांयकाळी ५ .३० वा महिला मेळावा आयोजित केला आहे . या  मेळाव्याचे उद्घघाटन  सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी  जयप्रकाश परब यांच्या हस्ते होत आहे. प्रमुख पाहुण्या म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ .मीना शेंडकर या लाभल्या आहेत. समितीच्या कार्यकर्त्या नंदिनी कोंडेकर संपादित ' स्वरकंठी ' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे हे आहेत.
रविवारी आठ मार्च  रोजी सकाळी समुद्रतट भटकंती नंतर जागतिक महिला दिनानिमित्त समितीच्या कोल्हापूर व कोकण विभागातील महिलांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ . मीना शेंडकर  यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे.  डायट जिल्हा सिंधुदुर्गच्या ज्येष्ठ अधिव्याख्याता सरिता कुदळे या उपस्थित राहणार आहेत . या कार्यकमाच्या समारोप  प्रसंगी   स्पर्धेतील विजेत्या महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे . .
जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे संयोजन महिला जिल्हाध्यक्ष सविता गिरी , महासचिव सारिका पाटील शहराध्यक्ष चारुलता पाटील , विद्या पाटील ,वर्षा वायदंडे रोहिणी येडगे , सुनीता डावरे, राकेश परब , नेहा गवंडे  केशव भोसले व कुणाल अंगणे हे करत आहेत .दोन दिवस चालणाऱ्या या जागतिक महिला दिन कार्यक्रमात कोल्हापूर व कोकण विभागातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष सविता गिरी व शहराध्यक्षा 
चारुलता पाटील यांनी केले आहे .
... . .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes