शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलींच्या गटात कोल्हापूर, तर मुलांच्या गटात पुणे विभाग विजेता !
schedule02 Nov 26 person by visibility 43 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर आणि आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज, मिणचे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १७ वर्षांखालील राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलींच्या गटात कोल्हापूर विभागाने, तर मुलांच्या गटात पुणे विभागाने विजेतेपद पटकावले. आदर्श विद्यानिकेतनच्या क्रीडांगणावर दिवसरात्र प्रकाशझोतात स्पर्धा झाल्या.
स्पर्धेच्या अंतिम सामन्यांना क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल मार्गदर्शक अजित पाटील, आदर्श शिक्षण समूहाचे उपप्राचार्य मनोहर परीट आणि ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक एम. टी. देसाई उपस्थित होते.
मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आश्रमशाळा, खामगाव (जि. बार्शी) संघाने लातूर विभागाच्या छत्रपती शिवाजी विद्यालय, धाराशिव संघाचा ३-० सेटने पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले. तर मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात कोल्हापूर विभागाच्या ईश्वरपूर संघाने पुणे विभागाच्या मोहोळ संघाचा ३-० सेटने पराभव करत विजेतेपद मिळविले. दोन्ही अंतिम सामने प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रंगले.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल मार्गदर्शक अजित पाटील, आदर्श शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दत्तात्रय घुगरे, ज्येष्ठ व्हॉलीबॉल मार्गदर्शक एम. टी. देसाई, उपप्राचार्य मनोहर परीट, राष्ट्रीय मार्गदर्शक प्रदीप साळोखे, सचिन पांडव, सागर जाधव, अमित शिंत्रे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी मुलांच्या गटातील उत्कृष्ट खेळाडू म्हणून धाराशिवच्या श्रेयश खांडेकर, तर मुलींच्या गटातील उत्कृष्ट खेळाडू म्हणून सांगलीच्या सिद्धी गायकवाड यांचा गौरव करण्यात आला.या राज्यस्तरीय स्पर्धेच्या यशस्वी नियोजनासाठी तालुका क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार, एल. जी. पवार, मनीषा पाटील, अजिंक्य चौगुले, अनिकेत बोडके, गौरव खामकर, संदीप जाधव, शिवाजी पाटील, गणेश भारती, गजानन शिंगाडे आदींनी विशेष परिश्रम घेतले. विद्यालयाच्या वतीने डॉ. दीपक शेटे, रणजित चौगुले आणि डॉ. चंद्रकांत बागणे यांनी स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी सांभाळत महत्त्वपूर्ण योगदान दिले. क अमृत चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.