Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेला प्रारंभपत्रकार विजय चोरमारे यांना भाई माधवराव बागल पुरस्कार, २८ मे रोजी वितरण समारंभडॉ. आर. के. कामत शिवाजी विद्यापीठाचे नवीन कुलगुरू शहरातील विद्युत दिव्यांचा विषय अंधातरीच…ईईएसएल कंपनीसोबतचा करार महापालिकेकडून रद्द, नवीन कंपनीचा प्रस्ताव सभागृहाने फेटाळलाशिक्षकेतर कर्मचारी समायोजन  विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करणार : राजेंद्र कोरे प्रा. श्रुती जोशी यांची इचलकरंजीत प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती शिक्षक बँकेच्या लवकरच पाच शाखांचा विस्तार, मुख्यालयासमोरील अतिक्रमणे हटवून सभासदांसाठी आरक्षित पार्किंगशहर काँग्रेसमध्ये फेरबदल, सचिन चव्हाणांना हटविले, प्रवीण केसरकर नवे शहराध्यक्ष !जिल्हाध्यक्षपदी सतेज पाटील ! !डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेसाठी डॉ. बापूजी साळुंखे पॉलिटेक्निकमध्ये सुविधा केंद्रऔषध विक्रेत्यांचा बंद, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

जाहिरात

 

शिक्षकेतर कर्मचारी समायोजन  विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करणार : राजेंद्र कोरे

schedule21 May 26 person by visibility 159 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  : राज्यातील खाजगी प्राथमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माध्यमिक शाळांमध्ये समायोजन करण्याच्या आदेशा विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल करणार असल्याचे, महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैठकीत बोलताना  स्पष्ट केले.
      राज्यातील खाजगी प्राथमिक शाळांतील लिपिक व सेवकांचे समायोजन त्याच संस्थेच्या माध्यमिक शाळांमध्ये करण्याचे आदेश 17 एप्रिल 2026 रोजी राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत. या कर्मचाऱ्यांची पदे ही एकाकी पदे असून, गतवर्षीच्या  संचमान्यते अखेर सदरची पदे कार्यरत दाखविण्यात आली. सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे सेवानिवृत्ती पर्यंत त्याच प्राथमिक शाळेत कार्यरत ठेवावीतअशी मागणी याचिकेत करण्यात येणार आहे.
      महासंघाच्या पुणे शाखेच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.महासंघाच्या कोल्हापूर,सांगली, सातारा,सोलापूर या शाखांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये याचिका दाखल करण्यात येणार आहे.
    बैठकीला महासंघाचे राज्यसचिव राजेंद्र कोरे राज्य सल्लागार एम.डी.पाटील, उपाध्यक्ष प्रदीप,मगदूम, जिल्हा शिक्षकेतर प्रमुख सागर जाधव, शहर शिक्षकेतर प्रमुख अर्जुन चाफोडीकर, गीता चव्हाण, सुचिता अग्निहोत्री, रूपाली कुलकर्णी, दिपाली जोशी, संजय चव्हाण, उदय चिंदके, जितेंद्र पाटील  उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes