Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेला प्रारंभपत्रकार विजय चोरमारे यांना भाई माधवराव बागल पुरस्कार, २८ मे रोजी वितरण समारंभडॉ. आर. के. कामत शिवाजी विद्यापीठाचे नवीन कुलगुरू शहरातील विद्युत दिव्यांचा विषय अंधातरीच…ईईएसएल कंपनीसोबतचा करार महापालिकेकडून रद्द, नवीन कंपनीचा प्रस्ताव सभागृहाने फेटाळलाशिक्षकेतर कर्मचारी समायोजन  विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करणार : राजेंद्र कोरे प्रा. श्रुती जोशी यांची इचलकरंजीत प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती शिक्षक बँकेच्या लवकरच पाच शाखांचा विस्तार, मुख्यालयासमोरील अतिक्रमणे हटवून सभासदांसाठी आरक्षित पार्किंगशहर काँग्रेसमध्ये फेरबदल, सचिन चव्हाणांना हटविले, प्रवीण केसरकर नवे शहराध्यक्ष !जिल्हाध्यक्षपदी सतेज पाटील ! !डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेसाठी डॉ. बापूजी साळुंखे पॉलिटेक्निकमध्ये सुविधा केंद्रऔषध विक्रेत्यांचा बंद, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

जाहिरात

 

शिक्षक बँकेच्या लवकरच पाच शाखांचा विस्तार, मुख्यालयासमोरील अतिक्रमणे हटवून सभासदांसाठी आरक्षित पार्किंग

schedule21 May 26 person by visibility 124 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गुरुजनांनी गुरुजनांसाठी चालविलेली बँक म्हणजे, दि प्राथमिक शिक्षक बँक. कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची ही आर्थिक शिखर संस्था. बँकेला मोठी परंपरा. या बँकेचे नूतन अध्यक्ष म्हणून एस. व्ही. पाटील व उपाध्यक्ष म्हणून गजानन कांबळे यांची निवड झाली. नूतन अध्यक्ष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची नुकतीच बैठक झाली. या साऱ्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष पाटील यांनी बँकेच्या माध्यमातून शिक्षक सभासदांसाठी विविध सुविधा राबविण्याला प्राधान्यक्रम राहील असे सांगितले.

सभासदाभिमुख योजना, पारदर्शक कारभार आणि सभासदांचा विश्वास या त्रिसुत्रीवर बँकेचे कामकाज सुरू आहे. राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडीने निवडणुकीच्या कालावधीत शिक्षक सभासदांना जी आश्वासने दिली त्या साऱ्यांची पूर्तता केली जात आहे.असे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. अध्यक्ष म्हणून कामकाज सुरू केल्यानंतर ते अधिकाधिक वेळ बँकेसाठी देत आहेत. गवत मंडई येथे बँकेचे मुख्यालय आहे. बँकेच्या समोरील जागा पार्किंगसाठी आरक्षित होती. मात्र त्याठिकाणी बाहेरील वाहने जास्त लागायची. पाटील यांनी अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर येथील अतिक्रमणे हटवून बँकेसमोरील संपूर्ण जागा ‘सभासदासाठी आरक्षित पार्किंग’म्हणून राखीव केली. पाटील यांनी स्वखर्चाने अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाचे नूतनीकरण करायचे ठरविले आहे.

एस. व्ही. पाटील हे प्राथमिक शिक्षक संघ थोरात गटाचे राज्य संपर्कप्रमुख आहेत. शिक्षक संघात सक्रियपणे काम करत असताना शिक्षकांच्या आर्थिक शिखर संस्थेच्या अध्यक्षपदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा टप्प्याटप्प्याने झाला आहे. ‘या साऱ्या कालावधीत शिक्षकांनी मोठी ताकत दिली आहेगुरुजनांनी गुरुजनांसाठी राबविलेली ही बँक समृद्ध बँक म्हणून ओळखली जाते. सध्या या बँकेची साडेसातशे कोटी रुपयांची उलाढाल आहे. . बँकेतील सभासदांसाठी विशेष योजना राबविणार आहोत. शिक्षक सभासदांचा अधिकतर उद्धार हे आमचे धोरण आहे. गुरुजनांसाठी घरबसल्या अधिक सुविधा देण्याचा प्राधान्य राहील. पुढील वर्षी दहा टक्के लाभांश देण्यासाठी व कर्जावरील व्याजदार दहा टक्क्यांवरुन नऊ टक्केपर्यत आणण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहोत. बँकेचे ६६१७ सभासद आहेत. ४५१ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. २९५ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. बँकेला तीन कोटी सहा लाख रुपयांचा नफा झाला आहे." असे अध्यक्ष पाटील यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. दरम्यान बँकेच्या सध्या ११ शाखा आहेत. नजीकच्या काळात कळे, बोरगाव, कागल, इचलकरंजी, साळवण येथे शाखा विस्तार करण्याचे नियोजित आहे. त्या अनुषंगाने हे संचालक मंडळात चर्चा झाली आहे. मात्र अजून त्या त्यासंबंधी अंतिम निर्णय झाला नाही.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes