Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेला प्रारंभपत्रकार विजय चोरमारे यांना भाई माधवराव बागल पुरस्कार, २८ मे रोजी वितरण समारंभडॉ. आर. के. कामत शिवाजी विद्यापीठाचे नवीन कुलगुरू शहरातील विद्युत दिव्यांचा विषय अंधातरीच…ईईएसएल कंपनीसोबतचा करार महापालिकेकडून रद्द, नवीन कंपनीचा प्रस्ताव सभागृहाने फेटाळलाशिक्षकेतर कर्मचारी समायोजन  विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करणार : राजेंद्र कोरे प्रा. श्रुती जोशी यांची इचलकरंजीत प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती शिक्षक बँकेच्या लवकरच पाच शाखांचा विस्तार, मुख्यालयासमोरील अतिक्रमणे हटवून सभासदांसाठी आरक्षित पार्किंगशहर काँग्रेसमध्ये फेरबदल, सचिन चव्हाणांना हटविले, प्रवीण केसरकर नवे शहराध्यक्ष !जिल्हाध्यक्षपदी सतेज पाटील ! !डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेसाठी डॉ. बापूजी साळुंखे पॉलिटेक्निकमध्ये सुविधा केंद्रऔषध विक्रेत्यांचा बंद, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

जाहिरात

 

जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेला प्रारंभ

schedule21 May 26 person by visibility 79 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्य सरकारच्या ग्रामविकास व जलसंधारण विभाग मंत्रालयाच्या पंधरा म्घ्े २०१४ च्या निर्णयानुसार जिल्हा परिषद कोल्हापूरकडील जिल्हास्तरावरील सामान्य प्रशासन, वित्त, महिला व बाल कल्याण विभाग, पशुसंवर्धन या विभागाकडील बदली प्रक्रिया राबविण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाकडील विनंती बदली 2 आपसी बदली दोन अशा एकूण चार बदल्या झाल्या. तर  वित्त विभागाकडील सहा लेखाधिकारी सर्व पदे भरलेने एकही बदली झाली नाही. महिला बाल कल्याण विभागकडील  विनंती बदली चार व आपसी एक मिळून पाच बदल्या झाल्या आहेत. पशुसंवर्धन विभागाकडील प्रशासकीय बदली दोन व  विनंती बदली एक अशा एकूण तीन बदल्या झाल्या.  बदली प्रक्रियेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जस्मिन, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओम प्रकाश यादव, मुख्य लेखा व वित्त अधिकारीआतुल आकुर्डे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितीन मस्के,  जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी प्रमोद बाबर उपस्थित होते. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना  ३१ मे २०२६ रोजी कार्यमुक्त केले जाणार आहे.  बांधकाम विभागाकडील बदली प्रक्रिया २२ मे रोजी तर आरोग्य विभागाकडील बदली प्रक्रिया येत्या २७ मे रोजी आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes