बहुजन माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी विकास कांबळे, उपाध्यक्षपदी सुजाता देसाई
schedule23 Jul 25 person by visibility 30 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा बहुजन माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी विकास कांबळे आणि उपाध्यक्षपदी सुजाता देसाई यांची निवड झाल. उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी एन. ए. माने यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली. विद्यमान अध्यक्ष दिलीप वायंदडे यांनी स्वागत केले. संस्थापक संचालक राहुल माणगांवकर, प्रकाश पोवार, संचालक रवींद्र मोरे, रघुनाथ कांबळे, विलास दुर्गाडे, संजय कांबळे, योगेश वराळे, बापू कांबळे, दत्तात्रय टिपुगडे, व्यवस्थापक बाबूराव साळोखे, वसुली अधिकारी समीर कळके उपस्थित होते. तज्ज्ञ संचालक रघुनाथ मांडरे यांनी मार्गदर्शन केले. संस्था समिती सदस्य नंदकुमार कांबळे यांनी संस्था सदस्यपदी सुजाता भास्कर यांच्या नावाची घोषणा केली.