Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शुक्रवारपासून तीन दिवसीय परिस सेंद्रिय खत महोत्सव मोटेवाडी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत, जखमींच्या उपचाराचा खर्चही सरकार करणारजनगणना कामात सहभागी शिक्षकांना बदली  रजा मंजूर करावीई चलन दंड माफीचा सरकारला विसर, कोल्हापुरात प्रदीप राठोंडाचे आमरण उपोषणमहापालिकेच्या मालकीची २१ कोटीची जागा विनावापर पडून ! विजय जाधवांनी वेधले आयुक्तांचे लक्ष!!राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राज्य सरकारचे विविध प्रकल्प - राजेश क्षीरसागरविद्यापीठीय - महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी राज्यव्यापी आंदोलनाच्या पावित्र्यातदोन वर्षे झाले, शंभर कोटीचा रस्ता प्रकल्प अद्याप अपूर्णच ! आपच्या कार्यकर्त्यांची आयुक्तांकडे तक्रार ! ! एक पाऊल प्रगतीकडे, अध्यक्षांचा दौरा तालुक्याकडे !  विकासकामांचा, प्रशासकीय यंत्रणेचा घेणार आढावा  !! चित्रकर्मी क्रिकेट लीगला प्रारंभ, अभिनेत्री सुरेखा कुडचींची उपस्थिती

जाहिरात

 

राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राज्य सरकारचे विविध प्रकल्प - राजेश क्षीरसागर

schedule12 May 26 person by visibility 40 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : जागतिक बँकेच्या सहाय्याने राज्य सरकारच्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रसंस्थेच्यावतीने महास्ट्राईड उपक्रम राबविला जात आहे. याद्वारे राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विविध प्रयोजने, प्रकल्प हाती घेण्यात आली आहेत. महास्ट्राईड उपक्रमाद्वारे राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला आर्थिक विकासाचे इंजिन बनवण्याचे ध्येय आहे. याद्वारे पर्यटन आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करून त्यातून रोजगार निर्मिती आणि शाश्वत प्रगती साधली जाणार असल्याची माहिती मित्र संस्थेचे उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.

जागतिक बँकेच्या सहाय्याने राबविण्यात येत असलेल्यामहास्ट्राईडउपक्रमांतर्गत, पर्यटन विभाग तसेच सांस्कृतिक कार्य विभाग हे अंमलबजावणी करणारे विभाग असून, पर्यटन विकासासाठी संस्थात्मक चौकट अधिक सक्षम करण्याच्या उद्देशानेडेस्टिनेशन मॅनेजमेंट ऑर्गनायझेशन स्थापन करून कार्यान्वित करण्यासंबंधीच्या निधी वितरणाशी जोडलेल्या निकषाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहेया अनुषंगाने ट्रायडंट हॉटेल, नरिमन पॉइंट, मुंबई येथेडी.एम.. कार्यान्वयन कार्यशाळेचेआयोजन करण्यात आले होते.

आमदार क्षीरसागर यांनी, जिल्ह्यास धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक नैसर्गिक पर्यटनाचा समृद्ध वारसा लाभलेला असून, या सर्व पर्यटन स्थळांचा एकात्मिक विकास करून जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून कोल्हापूरची ओळख निर्माण करण्यासाठी शासन सकारात्मक असून आवश्यक त्या सर्व योजना, निधी धोरणात्मक सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल.’असे नमूद केले.

या बैठकीस माजी सहकार मंत्री आमदार दिलीप वळसे पाटीलमित्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, महास्ट्राईड प्रकल्पाचे संचालक अमन मित्तल पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव संजय जगन्नाथ खंदारेमहाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या संस्थापक कुलगुरू डॉ.अपूर्वा पालकर, जागतिक बँकेच्या प्रतिनिधी नेहा गुप्ता, एम.टी.डी.सीचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटने आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes