Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शुक्रवारपासून तीन दिवसीय परिस सेंद्रिय खत महोत्सव मोटेवाडी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत, जखमींच्या उपचाराचा खर्चही सरकार करणारजनगणना कामात सहभागी शिक्षकांना बदली  रजा मंजूर करावीई चलन दंड माफीचा सरकारला विसर, कोल्हापुरात प्रदीप राठोंडाचे आमरण उपोषणमहापालिकेच्या मालकीची २१ कोटीची जागा विनावापर पडून ! विजय जाधवांनी वेधले आयुक्तांचे लक्ष!!राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राज्य सरकारचे विविध प्रकल्प - राजेश क्षीरसागरविद्यापीठीय - महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी राज्यव्यापी आंदोलनाच्या पावित्र्यातदोन वर्षे झाले, शंभर कोटीचा रस्ता प्रकल्प अद्याप अपूर्णच ! आपच्या कार्यकर्त्यांची आयुक्तांकडे तक्रार ! ! एक पाऊल प्रगतीकडे, अध्यक्षांचा दौरा तालुक्याकडे !  विकासकामांचा, प्रशासकीय यंत्रणेचा घेणार आढावा  !! चित्रकर्मी क्रिकेट लीगला प्रारंभ, अभिनेत्री सुरेखा कुडचींची उपस्थिती

जाहिरात

 

विद्यापीठीय - महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी राज्यव्यापी आंदोलनाच्या पावित्र्यात

schedule12 May 26 person by visibility 148 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : राज्यातील विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी चौदा मे २०२६ पासून  राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनातंर्गत कर्मचारी लोकशाही मार्गाने आंदोलन करताना प्रसंगी संपावर जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

 विविध प्रश्नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 'महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने' आक्रमक पवित्रा घेतला आहे. याबाबत मंगळवारी, १२ मे रोजी शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर शिवाजी विद्यापीठ कृती समितीची द्वार सभा झाली. यावेळी शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे अध्यक्ष तथा संयुक्त कृती समितीचे मुख्य संघटक मिलिंद प्रभाकर भोसले व कास्ट्राईब शिवाजी विद्यापीठ शाखेचे अध्यक्ष  आनंदराव खामकर यांनी मार्गदर्शन केले.

सातव्या वेतन आयोगानुसार १०, २० व ३० वर्षांच्या सेवेनंतर मिळणारी आश्वासित प्रगती योजना राज्य सार्वजनिक विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तात्काळ लागू करण्यात यावी. राज्य सार्वजनिक विद्यापीठांतील उर्वरित शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करावी. ०१ नोव्हेंबर, २००५ पूर्वी जाहिरात प्रक्रिया पूर्ण होऊन नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्ती मिळालेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देय असलेले रजारोखीकरण सातव्या वेतन आयोगानुसार अंतिम वेतनाच्या आधारे अदा करावे, शिक्षक पदभरतीप्रमाणेच राज्य सार्वजनिक विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयांतील रिक्त शिक्षकेतर पदे भरण्यास तात्काळ मंजुरी देण्यात यावी, विद्यापीठातील शैक्षणिक विभागातील प्रयोगशाळा सहायक व प्रयोगशाळा परिचर यांना रजारोखीकरणाचे लाभ पुर्ववत सुरु कराव्यात अशा विविध मागण्यासाठी आंदोलन पुकारले आहे. सरकारकडून तात्काळ व ठोस निर्णय न झाल्यास टप्याटप्याने आंदोलनाची व्याप्ती वाढविल जाईल असा इशारा दिला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes