Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
विविध उपक्रमानी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी कंपनी सचिव म्हणून प्रशासनासह खासगी कंपन्यातही करिअरच्या मोठया संधी - पवन चांडककेआयटीच्या आदित्य साळुंखेस २७ लाख ५० हजाराचे पॅकेज ! बेट्टी ब्लॉक्स आंतरराष्ट्रीय कंपनीत निवड !!  काँग्रेसमध्ये घराणेशाहीला ब्रेक ! पदाधिकारी बदलात नव्या चेहऱ्यांना संधी !!बाजार समितीच्या तीन संचालकांना भाडेकरार भोवणार ? जिल्हा उपनिबंधकानी मागवली माहिती महावीर कॉलेजच्या नूतन बोधचिन्हाचे उदघाटनअध्यक्ष महायुतीचा, सत्ता महायुतीची म्हणता मग गोकुळमध्ये हसन मुश्रीफ इतके हतबल कसे काय ? सतेज पाटीलदोन वर्षात कन्व्हेन्शन सेंटरचे काम पूर्णत्वास येईल, कोल्हापूरच्या विकासात हे सेंटर मैलाचा दगड ठरेल : आमदार राजेश क्षीरसागर प्रा. विनय पाटील यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सतरा एप्रिलला सत्कार सोहळा, गौरव ग्रंथाचे प्रकाशनवाढीव सभासद संस्थेवरुन गोकुळमध्ये महायुतीमध्ये झुंपली ! मंत्री मुश्रीफ - आमदार शिवाजी पाटील आमनेसामने

जाहिरात

 

महावीर कॉलेजच्या नूतन बोधचिन्हाचे उदघाटन

schedule13 Apr 26 person by visibility 74 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : येथील श्री आचार्यरत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळाच्या महावीर महाविद्यालयाच्या अधिकृत नव्या बोधचिन्हाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट के. ए. कापसे यांच्या हस्ते झाले.    निर्मिती ग्राफिक्सचे अनंत खासबारदार व शिरीष खांडेकर यांच्या प्रमुख  उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. संस्थेचे  सचिव मोहन गरगटे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

 निर्मिती ग्राफिक्सचे अनंत खासबारदार म्हणाले, भगवानांच्या तत्वज्ञानाचं सार व संपूर्ण मानवजातीच्या पुण्यविचारांचा विचार घेऊन महावीर महाविद्यालयाचा नवीन लोगो तयार केला आहे. ऊन, वारा, पाऊस झेलत जगाच्या नवीन तंत्रज्ञानाचा व  शिक्षणाच्या चारित्र्याच्या  वापर करून जळी, स्थळी, काष्ठी, पाषणी प्रत्येक आकाराचं भगवानांचं अस्तित्व दिसेल असा मानस्तंभ, दीपस्तंभ असा लोगो पाहणा-यांना यशाच, शिक्षण, धर्माचे  प्रतीक वाटेल. महावीर महाविद्यालयाने केवळ शिक्षण देण्याचे काम केले नाही. तर शिक्षण क्षेत्रात क्रांती करून  सर्व सामान्य गोर गरीब विद्यार्थ्यांच्या  शिक्षणाचा विचार करुन जागतिक पातळीवर चारित्र्याचा विचार केला असल्याचेही त्यांनी सांगितले.
 संस्थेचे चेअरमन ॲड. के. कापसे म्हणाले, बोधचिन्ह हे एका धर्माचे , तत्वाचे प्रतीक नसून मानव जातीच्या विकासासाठी, उत्कर्षासाठी बोधचिन्ह आहे. मंगलाचरण कोणत्याही ऋषीमुनींचे नाही तर सर्व साधू संताना वंदन आहे. मानवता ही फक्त मनुष्य प्राण्यात नाही तर वृक्षवेलीत देखील जीव आहे. ही संकल्पना मान्य होत आहे.यावेळी संचालक प्रदीप पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.   संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड. अभिजीत कापसे यांनी प्रास्ताविक केले.  डॉ. श्रद्धा पाटील, डॉ. संध्या जाधव यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य  डॉ. अव्दैत जोशी यांनी आभार मानले. स्नेहल कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes