Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कर्मचारी पतसंस्थेतर्फे गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफांचा सत्कारकोरगांवकर हायस्कूलमध्ये सवाद्य मिरवणुकीबरोबरच पुस्तक वाटपकंत्राटी कामगारांच्या हक्कांसाठी विजयनगरममध्ये मोटारसायकल रॅली जरगनगर विद्यामंदिरात अधिकाऱ्यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत, अरुंधती महाडिकांच्या हस्ते शालेय साहित्य वाटपकेंद्र शाळा पाचगावमध्ये विद्यार्थ्यांची वाजतगाजत मिरवणूकविद्या मंदिर शेळप शाळेत  जिल्हाधिकाऱ्यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवादप्रत्येक पालकाने आपल्या  विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत – आयुक्त के.  मंजूलक्ष्मी.केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घेतली डॉ डी. वाय. पाटील यांची भेटप्रार्थनेमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम- डॉ. विश्वनाथ एन. मगदूमहद्दवाढीच्या विरोधात मंगळवारी वीस गावांत बंद

जाहिरात

 

विद्या मंदिर शेळप शाळेत  जिल्हाधिकाऱ्यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

schedule16 Jun 25 person by visibility 21 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आज शाळेचा पहिला दिवस.प्रवेशोत्सवाची शाळेत लगबग सुरू होती.पावसाच्या सरी मुक्तपणे कोसळत होत्या.तेंव्हाच आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.अमोल येडगे यांचे शाळेत आगमन झाले. शाळेचे प्रवेशद्वार पाहूनच थक्क झाले. शाळेची बाग , परिसर, परसबाग पाहून शिक्षकांचे कौतुक केले. शाळेतील वर्गखोल्या,पट, विद्यार्थी, शिक्षक याविषयी माहिती घेतली. इयत्ता पहिली व चौथीच्या वर्गाला भेट दिली. वर्गातील आकर्षक बोलक्या भिंती पाहून आनंदित झाले. मुलांशी संवाद साधला. शालेय परिसर, वर्गखोल्या अतिशय सुंदर व बोलक्या असल्याने एकंदरीत शालेय कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले. आजऱ्याचे तहसीलदार समीर माने , पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय ढमाळ ,नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, गटशिक्षणाधिकारी बसवराज गुरव साहेब, मंडल अधिकारी गीता कुंभार मॅडम, शेळप गावचे सरपंच अर्जुन बागडी, ग्रामसेवक सानप, शाळेच्या मुख्याध्यापिका उषा आजगेकर मॅडम,अध्यापक संभाजी बापट, अर्चना पाटील, विषय शिक्षक परमेश्वर नलवडे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes