Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिक्षक-शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी  प्रा. जयंत आसगावकर यांना विजयी करा : मालोजीराजे छत्रपती सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता, १५६ जणांवर कारवाईप्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध- कौस्तुभ गावडेशिवसेनेचे उमेदवार सचिन सानप यांच्याकडून शिक्षक मतदारांना लक्ष्मीदर्शन - आमदार सतेज पाटलांचा आरोपशिक्षक मतदार संघातील उमेदवार प्रफुल्ल तावरेंचा प्रा.जयंत आसगावकरांना पाठिंबाकेडीसीसी बँकेसाठी आता काय करायला पाहिजे हे मुश्रीफांनी ठरवावे- सतेज पाटलांचा मर्मभेदी टोलानातवाच्या निवडणुकीसाठी आजोबांचा प्रचाराचा झंझावातराहुल पाटलांचा विजय…पीएन गटाला बळ !प्रामाणिक कामाला विजयाचे तोरण...!कौस्तुभ गावडेंच्या प्रचारासाठी साताऱ्यात शिक्षक सरसावले ! गृहभेटी वैयक्तिक संपर्काद्वारे प्रचारावर भर !!

जाहिरात

 

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता, १५६ जणांवर कारवाई

schedule22 Oct 26 person by visibility 27 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : शहरातील स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने प्लास्टिकचा वापर करणारे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे, उघड्यावर लघुशंका करणारे, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणारे, रस्त्यावर खरमाती टाकणारे तसेच उघड्यावर कचरा टाकणारे नागरिक व आस्थापनांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत १२ ते २१ ऑक्टोंबर २०२६ या कालावधीत विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १५६ व्यक्तींवर कारवाई करून दोन लाख साठ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांच्या आदेशानुसार व उपायुक्त परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

    महापालिकेच्या कारवाईमध्ये प्लास्टिकचा वापर करणाऱ्या ७१ नागरिक व व्यावसायिकांकडून  ७५ हजार ९०० रुपये, उघड्यावर कचरा टाकणाऱ्या ६६ नागरिकांकडून एक लाख ७१ हजार ४०० रुपये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान, लघुशंका व थुंकणाऱ्या १५ व्यक्तींकडून सहा हजार २०० रुपये, तर अतिक्रमण करणाऱ्या चार व्यक्तींकडून सात हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

            शहरातील स्वच्छता अबाधित राहावी, सार्वजनिक ठिकाणी होणारे उपद्रव रोखले जावेत तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जबाबदारीची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने महापालिकेच्या आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत ही विशेष मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे., दैनंदिन कचरा केवळ महापालिकेच्या अधिकृत घंटागाडीकडेच द्यावा. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर कचरा जाळणे, रस्त्यावर अथवा नाल्यात कचरा टाकणे तसेच प्लास्टिक वापराबाबतच्या नियमांचे उल्लंघन करणे आढळून आल्यास लागू नियम व संबंधित कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. आवश्यकतेनुसार संबंधितांविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes