Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिक्षक-शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी  प्रा. जयंत आसगावकर यांना विजयी करा : मालोजीराजे छत्रपती सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता, १५६ जणांवर कारवाईप्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध- कौस्तुभ गावडेशिवसेनेचे उमेदवार सचिन सानप यांच्याकडून शिक्षक मतदारांना लक्ष्मीदर्शन - आमदार सतेज पाटलांचा आरोपशिक्षक मतदार संघातील उमेदवार प्रफुल्ल तावरेंचा प्रा.जयंत आसगावकरांना पाठिंबाकेडीसीसी बँकेसाठी आता काय करायला पाहिजे हे मुश्रीफांनी ठरवावे- सतेज पाटलांचा मर्मभेदी टोलानातवाच्या निवडणुकीसाठी आजोबांचा प्रचाराचा झंझावातराहुल पाटलांचा विजय…पीएन गटाला बळ !प्रामाणिक कामाला विजयाचे तोरण...!कौस्तुभ गावडेंच्या प्रचारासाठी साताऱ्यात शिक्षक सरसावले ! गृहभेटी वैयक्तिक संपर्काद्वारे प्रचारावर भर !!

जाहिरात

 

शिक्षक-शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी  प्रा. जयंत आसगावकर यांना विजयी करा : मालोजीराजे छत्रपती 

schedule22 Oct 26 person by visibility 49 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : ‘शिक्षक आणि शिक्षण  क्षेत्रातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार जयंत आसगावकर यांना विजयी करा, गेली सहा वर्षे शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने ते पुढे असतात. फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा वारसा त्यांनी जपला आहे’ असे आवाहन माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी केले.

पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार व विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ मेळावा आयोजित केला होता. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेतील  शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मेळावा झाला. याप्रसंगी मालोजीराजे छत्रपती बोलत होते.   आमदार जयंत आसगावकर, महानगरपालिकेतील गटनेते व काँग्रेसचे नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे, माजी प्राचार्य डॉ. व्ही.एम.पाटील  यांची यावेळी  प्रमुख उपस्थिती होती.   श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे  यांचे मार्गदर्शन  मिळाले. 
     प्रा. जयंत असगावकर म्हणाले,  शिक्षक व शिक्षण क्षेत्राच्या प्रश्नांसाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करीत आहोत.  आमदारकीचा सर्व निधी शिक्षण संस्थां, शाळांमध्ये  खर्च केला आहे.  शिक्षकांचे अनेक  प्रश्न आजही  आहेत . या प्रश्नांचे सोडवणुकीसाठी काँग्रेससह महाविकास आघाडीने मला उमेदवारी दिली आहे. सर्वांनी एक नंबर पसंतीचे मतदान करून निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. डीडी आसगावकर व श्रीपतराव बोंद्रे दादा यांचा मोठा स्नेह असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.    प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी प्रा. असगावकर यांच्या आमदार फंडातून विविध वस्तू महाविद्यालयाला मिळाल्याचे सांगितले. पुरोगामी विचारालाच निवडून देण्याचे आवाहन  केले. प्रा. पी. के.पाटील यांनी स्वागत केले.  डॉ. के. एम. देसाई यांनी आभार मानले.  मुख्याध्यापक युवराज पवार, विठ्ठल आबंले, प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले आदी पस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes