नातवाच्या निवडणुकीसाठी आजोबांचा प्रचाराचा झंझावात
schedule21 Oct 26 person by visibility 530 categoryशैक्षणिक
आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : ' ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार' हे संस्थेचे ब्रीद वाक्य. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी या संस्थेची उदात्त हेतूने स्थापना केलेली. राज्यभर संस्थेच्या ज्ञान शाखा. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि पदवी... शिक्षणाची संधी या संस्थेने उपलब्ध केलेली. पदव्युत्तर अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांना कौशल्यभिमुख बनवण्यासाठी व्यावसायिक कोसेस सुरू केलेले. शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांनी ज्या उदात्त भावनेने ही संस्था स्थापन केली, त्यांच्या विचार कार्याचा तोच वसा तितक्याच सक्षमपणे साळुंखे कुटुंबीय पुढे चालवत आहे. बापूजींचे विचार कार्य आणि शैक्षणिक कार्याचा वारसा तितक्याच सक्षमपणे पुढे चालवणारे व्यक्तिमत्व म्हणजे संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे... वयाची 80 वर्षे ओलांडलेले... पण संस्थेच्या कार्यात आणि शैक्षणिक वाटचालीसाठी पाऊले तितकीच दमदार... त्यांचे काम तरुणांनाही लाजवणारे... पुणे शिक्षक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांचे आणि गुरुदेव कार्यकर्ते यांच्या सोबत जोडलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याची पाचही जिल्ह्यात प्रचिती येत आहे.
पुणे शिक्षक मतदार संघातून महायुतीचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे कौस्तुभ मुरलीधर गावडे हे निवडणूक लढवीत आहेत. सर्वात तरुण व अभ्यासू मेजर म्हणून शिक्षक मतदारांच्या पसंतीचे उतरत आहेत. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकमार साळुंखे यांचे ते नातू तसेच संस्थेच्या दिवंगत सचिवा प्राचार्य शुभांगी गावडे यांचे ते चिरंजीव. पणजोबा, आजोबा व आई...यांच्या शैक्षणिक कार्याचा मोठा वारसा त्यांना लाभलेला... संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी त्यांच्यावर. संस्थेचे कामकाज सांभाळत असताना ते पुणे शिक्षक मतदार संघातून महायुतीचे उमेदवार म्हणून समोर आले आहेत. गेली तीन-चार वर्षे ते शिक्षक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आंदोलनात सक्रिय आहेत. जिल्हास्तरावरील मोर्चा असो की विभागीय आणि मंत्रालय पातळीवर प्रशासनासोबत पाठपुरावा प्रत्येक ठिकाणी कौस्तुभ गावडे हे आघाडीवर आहेत. कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे या पाचही जिल्ह्यात त्यांच्या उमेदवारीला प्रतिसाद मिळत आहे.
कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारात संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे हे आघाडीवर आहेत. शिक्षण क्षेत्रात आयुष्य घालवलेल्या अभयकुमार साळुंखे यांचे पाचही जिल्ह्यांमध्ये मोठे नेटवर्क आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक अशा विविध घटकाशी संबंधित आहेत. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्याना ते 'गुरुदेव -कार्यकर्ते' म्हणून संबोधतात... कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारासाठी त्यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात प्रचार दौरा केला व्यक्तिगत संपर्क साधला. संस्थाचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भेटी घेतल्या. शिक्षणाशी निगडित विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तरुणाने अभ्यासू नेतृत्व विधान परिषदेमध्ये हवे यासाठी कौस्तुभ गावडे यांना संधी द्या असे आवाहन ते करत आहेत... त्यांच्या आवाहनाला शिक्षक मतदारांचा प्रतिसाद ही मिळत आहे.
.................
या भेटीगाठींमध्ये माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार अशोकराव जांभळे, माजी मंत्री जयवंतराव आवळे, माजी आमदार राजूबाबा आवळे, ना. बा. एज्युकेशन सोसायटीचे कृष्णाजी बोहरा व श्रीनिवासजी बोहरा,डीकेटीईचे संचालक सुनील पाटील आणि प्रा. शेखर शहा, व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे कौशिक मराठे, तात्यासाहेब विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे धोंडीराम कस्तुरे, ना. बा. एज्युकेशन संस्थेचे विश्वस्त व नॅशनल हायस्कूलचे अहमद मुजावर, श्रद्धा परिवाराचे प्रा. ए. आर. तांबे, खंजिरे शिक्षण समूहाचे अरुण खंजिरे व राहुल खंजिरे, सरस्वती हायस्कूलचे अमरसिंह माने आणि गुरुकुल संस्थेचे गणेश नायकवडे यांच्यासह मान्यवरांच्या भेटी घेतल्या.
....................
'शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असणारे आणि शिक्षण क्षेत्रातील अडचणी समजून घेणारे नेतृत्व विधान परिषदेत पोहोचणे आवश्यक आहे. कौस्तुभ गावडे यांच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडून ते मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, शिक्षण क्षेत्रातील अडचणी आणि शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी सक्षम प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी कौस्तुभ गावडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा.' - अभयकुमार साळुंखे