केडीसीसी बँकेसाठी आता काय करायला पाहिजे हे मुश्रीफांनी ठरवावे- सतेज पाटलांचा मर्मभेदी टोला
schedule21 Oct 26 person by visibility 371 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ' गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीकडे चार हजार चारशे ठराव आहेत असे नेते मंडळी सांगत होते. मग मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मुलाविरुद्ध षडयंत्र कोणी रचले? मंत्री मुश्रीफ यांची संशयाची सुई महायुतीच्या नेते मंडळी भोवतीच फिरत आहे. मुश्रीफ यांनी आत्मचिंतन करावे आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकी संदर्भात काय करायला पाहिजे ? हे त्यांनी ठरवावे.' असा मर्मभेदी टोला काँग्रेसचे नेते व आमदार सतेज पाटील यांनी लगावला.
गोकुळ निवडणुकीच्या निकालानंतर मंत्री मुश्रीफ यांनी चिरंजीव नवीद मुश्रीफ यांच्या पराभवावर बोलताना माझ्या मुलाविरुद्ध षड्यंत्र रचले गेले असा आरोप केला. त्या आरोपाच्या अनुषंगाने आमदार सतेज पाटील म्हणाले, गोकुळ निवडणुकीच्या अगोदर महायुतीतील सारे नेतेमंडळी आमच्याकडे चार हजार चारशे ठराव आहेत असे सांगत होते. मग मंत्री मुश्रीफ यांच्या मुलाविरुद्ध षडयंत्र कोणी रचले ? हे त्यांनी तपासून पाहावे. आता तर केंद्रनिहाय मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. मंत्री मुश्रीफ यांनी जो आरोप केला आहे त्यानुसार त्यांच्या आरोपाच्या संशयाची सुई महायुतीतील नेते मंडळींच्या भोवतीच फिरत आहे . समविचारी आघाडी म्हणून मी माझ्या पॅनेलमधील सगळ्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न करणार हे निश्चित आहे मग महायुतीमध्ये कोणी कोणावर षड्यंत्र रचले हे त्यांनी आत्मचिंतन करावे.'
गोकुळ दूध संघाच्या नूतन चेअरमनांची निवड 29 ऑक्टोबर रोजी 2026 रोजी होण्याची शक्यता असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले