Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
अध्यक्ष - उपाध्यक्षांनी घेतली काँग्रेसच्या सदस्यांची भेट, सोमवारी महायुतीची बैठकट्रॅक्टर ट्रॉली अंगावर, साखर कारखान्याच्या दोघा कर्मचाऱ्यांचा मृत्यूशाळांच्या स्वच्छतागृहांच्या सफाईसाठी ग्रामपंचायतींना पत्र द्या, पुरोगामी शिक्षक संघटनेचे सीईओंना निवेदनविकासकामांना विलंब खपवून घेणार नाही, आमदार राजेश क्षीरसागरांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोलराष्ट्रीय महिला कलाकार कार्यशाळेचे दिमाखात उद्घाटन, तीन दिवस  विविध कार्यक्रमडॉ. पी. एम. चौगुले लिखित औषधांच्या पलीकडे : एक सायकियाट्रिस्टची यशोगाथा पुस्तकाचे रविवारी प्रकाशनरिक्षा व्यावसायिकांचे सोमवारी रिक्षा बंद आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेमंत्री -आमदारांच्या निधीच्या अट्टाहासामुळे जिल्हा परिषद सदस्यावर उपोषणाची वेळ, काँग्रेसचा हल्लाबोलकोल्हापुरातील तालमीत साकारणार पैलवान ग्रंथालय, शनिवारी पुस्तक भेट- लोगो अनावरणाचा कार्यक्रम! नव्या निवडीत महापौरपदी मूळ ओबीसींना संधी  ! की दाखले काढणाऱ्यांची चलती ?

जाहिरात

 

डॉ. पी. एम. चौगुले लिखित औषधांच्या पलीकडे : एक सायकियाट्रिस्टची यशोगाथा पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

schedule20 Nov 26 person by visibility 77 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी -: कोल्हापुरातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. पी. एम. चौगुले लिखित ‘औषधांच्या पलीकडे : एक सायकियाट्रिस्टची यशोगाथा’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ रविवारी (२२ नोव्हेंबर २०२६) आयोजित केला आहे. मनोविकारतज्ज्ञ डॉ. नंदू मुलमुले यांच्या हस्ते आणि साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होत आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे सकाळी दहा वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, जेरियाट्रिक सोसायटी, स्वस्तिक हॉस्पिटल आणि भाग्यश्री प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे.

डॉ. चौगुले म्हणाले, ‘हे पुस्तक म्हणजे केवळ वैद्यकीय उपचारांचा लेखाजोखा नाही. तर रुग्णातील माणसाला समजून घेणारा व अंतर्मुख करणारा प्रवास आहे. या पुस्तकात एकूण ३८ कथावजा लेखांमधून आजारपणातून बाहेर पडलेल्या रुग्णांची यशोगाथा उलगडली आहे. अंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर पडून शास्त्रीय उपचाराकडे वळलेले, व्यसनाधीनतेवर मात करणारी आणि कौटुंबीक तणावातून मार्ग काढणाऱ्या रुग्णांच्या अनुभवावर आधारित हे पुस्तक आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळयास साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे. ’ पत्रकार परिषदेला डॉ. ए. बी. पाटील, डॉ. महावीर मिठारी, डॉ. संदीप पाटील, डॉ. दीपक जोशी, डॉ. निखिल चौगुले, भाग्यश्री पाटील आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes