राष्ट्रीय महिला कलाकार कार्यशाळेचे दिमाखात उद्घाटन, तीन दिवस विविध कार्यक्रम
schedule20 Nov 26 person by visibility 90 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी -: स्वर्गीय डॉ. वासंती जोशी यांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून राष्ट्रीय महिला कलाकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही तीन दिवसीय कार्यशाळा लोळगे फार्म, सुर्वेनगर येथे होत आहे. ग्वाल्हेर येथील कल्पवृक्ष आर्ट गॅलरीचे संस्थापक प्रमोद कुमार जोशी यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा साकार होत आहे.
कार्यशाळेचे उदघाटन सांगलीच्या उद्योजक शर्वरी पवार, कोल्हापुरातील चित्रकार अस्मिता जगताप, कल्पवृक्ष आर्ट फाऊंडेशन गँलरीचे संस्थापक प्रमोद कुमार जोशी, कोल्हापूर फाउंडेशनचे कार्यवाह प्रशांत जाधव, प्रा. संजय गायकवाड, पूजा लोडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. कार्यशाळेत अस्मिता जगताप, माधुरी पाटणकर, सुप्रिया सुतार, अर्चना कुंभार, विनया कुलकर्णी, राधा सुतार, गौरी पालेकर, नीलाक्षी घोणे, श्रद्धा चराटकर, वैशाली पाटील, अर्चना देसाई, अर्चना सूर्यवंशी (गुजरात), साक्षी पंगिरे (कर्नाटक) आदी महिला कलाकार सहभागी होणार आहेत. कार्यशाळेत थेट चित्र प्रात्यक्षिके , पेपर कोलाज मोझॅक आर्ट, कला प्रदर्शन आणि सांस्कृतिक आदान-प्रदान, असे विविध उपक्रम होणार आहेत.