Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आमदार शिवाजी पाटील यांनी वेळ द्यावा, सगळया मुद्यावर खुलासा करू ! गोकुळचा पैसा दूध उत्पादकांच्या हितासाठीच !! चेअरमन नविद मुश्रीफप्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसने आता कौशल्य विकास विद्यापीठाकडे वाटचाल करावी - डॉ. सुनीलकुमार लवटेशाळा गुणवत्ता मूल्यांकन- आश्वासन आराखडामध्ये स्वयं मूल्यांकन प्रक्रियेत कोल्हापूर राज्यात तृतीय क्रमांकावरकोल्हापूर शहरातील समस्या दूर करण्याला प्राधान्य द्या- आमदार अमल महाडिकराज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा एक जूनपासून मोफत : परिवहनमंत्री प्रताप सरनाईक विद्यार्थीप्रिय शिक्षक ! उत्तम वाचक - वक्ते अन् प्रगतशील शेतकरीही !!बाजार समिती एक सचिव दोन, शासकीय सचिव नियुक्तीविरोधात वळंजूची तक्रारबाजार समिती सभापती नानासो कांबळे यांचा कार्यालयीन प्रवेशसमूह विद्यापीठांनी मानांकन उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहावे: कुलपती जिष्णू देव वर्मागोकुळमध्ये शह-काटशहाचे राजकारण! आमदारांची तक्रार, दोन दिवसात सहाय्यक निबंधकांची बदली

जाहिरात

 

राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा एक जूनपासून मोफत : परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

schedule17 Apr 26 person by visibility 264 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर, : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून येत्या १ जूनपासून राज्यातील सर्वच बस स्थानकांवरील शौचालय सुविधा प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकाच्या पाहणी दौऱ्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. प्रवाशांकडून बस भाड्याच्या माध्यमातून आधीच स्वच्छता कर वसूल केला जातो, त्यामुळे आता हा निधी महामंडळ स्वतः खर्च करणार असून, खासगी कंत्राटदारांमार्फत चालवली जाणारी शौचालय व्यवस्था बंद करून महामंडळ स्वतः त्याची जबाबदारी घेणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात सरकारी निधीतून बांधण्यात आलेल्या चार नूतन बसस्थानकांच्या उद्घाटनासाठी मंत्री सरनाईक कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी मध्यवर्ती बस स्थानकातील स्वच्छता गृह, उपाहारगृह, हिरकणी कक्ष आणि प्रवासी कक्षांची बारकाईने पाहणी केली. प्रवाशांशी थेट संवाद साधताना त्यांनी अवाजवी पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेतली. बस स्थानकाचा परिसर आणि स्वच्छता गृहे केवळ मंत्र्यांच्या दौऱ्यापुरती मर्यादित न राहता ती कायमस्वरूपी स्वच्छ राहिली पाहिजेत; त्यासाठी दर चार तासांनी स्वच्छता करणे अनिवार्य असेल, असे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

बस स्थानकावरील उपाहारगृहात गरजूंसाठी ३० रुपयांत चहा आणि नाश्ता देण्याची योजना कागदावरच असल्याचे पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ही योजना २४ तासांत पूर्ववत करून त्याबाबतचे फलक दर्शनी भागात लावण्याचे आदेश त्यांनी दिले, अन्यथा संबंधित उपाहारगृह चालकांवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले. प्रवाशांना मिळणाऱ्या सेवांमध्ये कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे सांगत त्यांनी एम. टी. तेगनमन्नी पेपर स्टॉललाही भेट दिली. स्थानकांवरील मूलभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यावर सरकारचा विशेष भर असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

या पाहणी दौऱ्यावेळी राज्य परिवहन महामंडळाच्या (पुणे प्रदेश) प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर, विभागीय वाहतूक परिवहन अधिकारी अनिल मेहतर यांच्यासह स्थानिक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. स्वच्छतेबाबत आणि विनाशुल्क सुविधांबाबत जर कोणी हलगर्जीपणा केला किंवा प्रवाशांकडून बेकायदेशीरपणे पैसे वसूल केले, तर विभागीय परिवहन अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी, या सूचनाही मंत्री सरनाईक यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes