Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आमदार शिवाजी पाटील यांनी वेळ द्यावा, सगळया मुद्यावर खुलासा करू ! गोकुळचा पैसा दूध उत्पादकांच्या हितासाठीच !! चेअरमन नविद मुश्रीफप्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसने आता कौशल्य विकास विद्यापीठाकडे वाटचाल करावी - डॉ. सुनीलकुमार लवटेशाळा गुणवत्ता मूल्यांकन- आश्वासन आराखडामध्ये स्वयं मूल्यांकन प्रक्रियेत कोल्हापूर राज्यात तृतीय क्रमांकावरकोल्हापूर शहरातील समस्या दूर करण्याला प्राधान्य द्या- आमदार अमल महाडिकराज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा एक जूनपासून मोफत : परिवहनमंत्री प्रताप सरनाईक विद्यार्थीप्रिय शिक्षक ! उत्तम वाचक - वक्ते अन् प्रगतशील शेतकरीही !!बाजार समिती एक सचिव दोन, शासकीय सचिव नियुक्तीविरोधात वळंजूची तक्रारबाजार समिती सभापती नानासो कांबळे यांचा कार्यालयीन प्रवेशसमूह विद्यापीठांनी मानांकन उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहावे: कुलपती जिष्णू देव वर्मागोकुळमध्ये शह-काटशहाचे राजकारण! आमदारांची तक्रार, दोन दिवसात सहाय्यक निबंधकांची बदली

जाहिरात

 

समूह विद्यापीठांनी मानांकन उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहावे: कुलपती जिष्णू देव वर्मा

schedule17 Apr 26 person by visibility 82 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : समूह विद्यापीठांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानांकनात आपले स्थान उंचावण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करून गुणवत्ता वृद्धी करावी.  समाज उपयोगी उपक्रमाच्या अनुषंगाने क्षयरोग (निर्मूलनाबाबतही विद्यापीठांनी सहभाग घ्यावा. समाजात यासंबंधी जनजागृती करण्यासाठी विद्यापीठांनी  प्रयत्नशील राहून विद्यार्थ्यांसाठी पोस्टर स्पर्धा, मराठी व हिंदी भाषेतील घोषवाक्य, कविता इत्यादींसारखे नाविन्यक्रम उपक्रम राबवावेत.असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती जिष्णू देव वर्मा यांनी केले.

राज्यपाल वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील समूह विद्यापीठांच्या कुलगुरूंची महत्त्वपूर्ण बैठक   लोकभवन मुंबई येथे पार पडली. या बैठकीत वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डी. टी. शिर्के व प्रभारी कुलसचिव डॉ. आर. बी. पाटील उपस्थित होते. कुलगुरू शिर्के यांनी वारणा विद्यापीठाचा सविस्तर अहवाल सादर केला. तसेच वारणा विद्यापीठांतील महाविद्यालयांनी क्षयरोग निर्मूलनाबाबत जनजागृती उपक्रम आराखडा  तयार करण्यासाठी महाविद्यालयाच्या  प्राचार्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes