Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आमदार शिवाजी पाटील यांनी वेळ द्यावा, सगळया मुद्यावर खुलासा करू ! गोकुळचा पैसा दूध उत्पादकांच्या हितासाठीच !! चेअरमन नविद मुश्रीफप्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसने आता कौशल्य विकास विद्यापीठाकडे वाटचाल करावी - डॉ. सुनीलकुमार लवटेशाळा गुणवत्ता मूल्यांकन- आश्वासन आराखडामध्ये स्वयं मूल्यांकन प्रक्रियेत कोल्हापूर राज्यात तृतीय क्रमांकावरकोल्हापूर शहरातील समस्या दूर करण्याला प्राधान्य द्या- आमदार अमल महाडिकराज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा एक जूनपासून मोफत : परिवहनमंत्री प्रताप सरनाईक विद्यार्थीप्रिय शिक्षक ! उत्तम वाचक - वक्ते अन् प्रगतशील शेतकरीही !!बाजार समिती एक सचिव दोन, शासकीय सचिव नियुक्तीविरोधात वळंजूची तक्रारबाजार समिती सभापती नानासो कांबळे यांचा कार्यालयीन प्रवेशसमूह विद्यापीठांनी मानांकन उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहावे: कुलपती जिष्णू देव वर्मागोकुळमध्ये शह-काटशहाचे राजकारण! आमदारांची तक्रार, दोन दिवसात सहाय्यक निबंधकांची बदली

जाहिरात

 

बाजार समिती एक सचिव दोन, शासकीय सचिव नियुक्तीविरोधात वळंजूची तक्रार

schedule17 Apr 26 person by visibility 67 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत शासकीय सचिवाची नियुक्ती करण्यात आली आहे. सहकारी संस्थेतील जिल्हा उप सहकार निबंधक युसूफ शेख यांच्याकडे बाजार समितीतील शासकीय सचिवपदाचा अतिरिक्त पदभार सोपविला आहे. जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी, शेख यांना बाजार समितीच्या सचिवपदाचा  पदभार घेण्याबाबतचे पत्र दिले. त्यानुसार शेख यांनी गुरुवारी, सोळा एप्रिल रोजी कार्यभार स्वीकारला. दरम्यान बाजार समितीत तानाजी दळवी हे सचिव म्हणून कार्यरत आहेत.त्यांना अद्याप पदमुक्त केले नाही. यामुळे बाजार समिती एक आणि सचिव दोन अशी स्थिती बनली आहे.  तथापि बाजार समितीत शासकीय सचिव नियुक्तीचा निर्णय हा नियमबाह्य अशी तक्रार व्यापार प्रतिनिधी संचालक नंदकुमार वळंजू यांनी केले आहे. त्यांनी शासकीय सचिव नियुक्तीच्या विरोधात कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली आहे. दळवी यांना पदमुक्त न करताच नवीन सचिव नेमणे हे नियमबाह्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes