नूतन मराठी विद्यालय हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना रोटरी हेरिटेजचे बळ
schedule05 Jul 25 person by visibility 77 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीच्या नूतन मराठी विद्यालय हायस्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी रोटरी हेरिटेज क्लबने अत्यावश्यक साहित्य वितरण करत त्यांना पाठबळ दिले आहे. क्लबकडून विद्यार्थ्यांना रेनकोट, छत्री व सायकल प्रदान करण्यात आल्या. रोटरी हेरिटेजचे खजानिस प्रशांत मेहता म्हणाले, सातत्य ही यशाची पहिली पायरी आहे. त्यामुळे नियमित शाळेत येणे, अभ्यास करण्याला महत्व देण्याची गरज आहे. कार्यक्रमाला रोटरी हेरिटेजच्या नूतन प्रेसिडेंट पूजा गांधी, सेक्रेटरी श्रुती मंत्री ,सदस्य मिलिंद करमळकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन उदय सांगवडेकर होते. नियामक मंडळाचे सदस्य प्रशांत कुलकर्णी यांची उपस्थिती होती. जिमखाना प्रमुख रश्मी भागवत यांनी प्रास्ताविक केले. होतकरू विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन अरुणा वडणगेकर यांनी केले. समारंभ प्रमुख संजीवनी देशपांडे यांनी आभार मानले. पल्लवी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.