Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शाळेची पटसंख्या वाढली, विभागीयस्तरावर क्रमांक ! मंत्र्यांकडून मुख्याध्यापक- शिक्षकांना शाबासकी ! !जिल्हा नियोजनचा २९२ कोटीचा निधी , आमदार -मंत्र्यांची नको भागिदारी ! शंभर टक्के निधी हवा जिप सदस्यांना, सर्वपक्षीय सदस्यांची सह्यांची मोहीम ! ! जिल्हा परिषद सदस्यांना समाधानकारक निधी देणार - मंत्री हसन मुश्रीफशिक्षण विभागाच्या कारभाराची दबक्या आवाजात चर्चा व्हायला नको : मंत्री मुश्रीफांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना सूचनाविद्यार्थिनींच्या सहभागातून पर्यावरण संरक्षणाची चळवळ उभारू या : डॉ. जगन्नाथ पाटील खासगीकरणाला रंगकर्मींचा विरोध, मंगळवारी नाट्यगृहासमोर धरणे आंदोलनसंमेलन शाहू कार्य संवर्धनाचे !  निर्धार शाहू विचारांची ‘झेन झी’पिढी घडविण्याचे ! !जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या तज्ञसंचालकपदी  स्वप्निल घस्तेजागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त उद्योजकांचा सन्मान, प्रशिक्षणर्थींना प्रमाणपत्र वितरण उत्साहातगुणीदास फाऊंडेशने घडविली ‘तीर्थ विठ्ठल’मधून अभंग -भक्तीसंगीताची वारी

जाहिरात

 

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त उद्योजकांचा सन्मान, प्रशिक्षणर्थींना प्रमाणपत्र वितरण उत्साहात

schedule26 Jul 26 person by visibility 70 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, कोल्हापूर यांच्या वतीने जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त "यशस्वी प्रशिक्षणार्थी, उद्योजकांचा सन्मान व प्रमाणपत्र वितरण सोहळा" उत्साहात झाला.

 भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. फाऊंडेशनचे राज्य समन्यवक सुधाकर भदरगे,उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी सारंग कापूरकर, सुषमा पाटील, शीतल तिरुके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व, युवकांसाठी उपलब्ध रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी तसेच उद्योगांच्या बदलत्या गरजांनुसार कौशल्य आत्मसात करण्याची आवश्यकता यावर मार्गदर्शन केले. कौशल्य विकासाच्या माध्यमातून युवकांनी आत्मनिर्भर बनून समाजाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण केले. विद्यार्थ्यांनी, कौशल्य प्रशिक्षणामुळे आयुष्यात झालेल्या सकारात्मक बदलांची माहिती दिली. सीमा स्वामी, नीता आवळे यांनी सूत्रसंचालन केले. विभागप्रमुख आसमा पठाण यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes