Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
छत्रपती शिवराय, करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी रथोत्सव थाटातपतसंस्था फेडरेशनच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी  अरुंधती महाडिक ! खासदार धनंजय महाडिकांना सहकाररत्न पुरस्कार !!राज्यातील २५ बडया अधिकाऱ्यांच्या एकाचवेळी बदल्या, कोल्हापूरला तीन नवीन अधिकारीकार्तिकेयन एस यांची बदली, कोल्हापूर जिप सीईओपदी डॉ. जस्मिन के. मंजुलक्ष्मी यांची बदली, महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ. राजेंद्र भारुड अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी वर्षा सिंघण यांची तडकाफडकी बदलीमहापालिकेत नगरसेवक- अधिकाऱ्यांत खडाजंगी, आयुक्तांनी दिले कारवाईचे आदेशकेडीसीसी बँकेचा व्यवसाय २१ हजार ३७१ कोटींवर, ढोबळ नफा २८७ कोटीनालेसफाईचा सविस्तर कृती आराखडा दोन दिवसात सादर करा - राजेश क्षीरसागर मंत्री चंद्रकांत पाटील म्हणजे एक मुक्त विद्यापीठ, हसन मुश्रीफांची कोपरखळी

जाहिरात

 

प्राथमिक दूध संस्थांच्या न्यायासाठी गोकुळच्या संचालकांनी ठोकला शडडू

schedule30 Mar 26 person by visibility 101 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : गोकुळ संघाशी संलग्न प्राथमिक दूध संस्थांना न्याय मिळावा, अवसायन नोटीसचा पुनर्विचार करावा तसेच पात्र संस्थांचा मतदान हक्क अबाधित ठेवावा, अशी ठाम भूमिका गोकुळची असल्याचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी व्यक्त केली. कोल्हापूर जिल्हा दूध संस्था बचाव समितीच्या वतीने ताराबाई पार्क येथील धैर्यप्रसाद हॉलमध्ये आयोजित प्राथमिक दूध संस्थाना न्याय हक्क मिळवण्यासाठी तसेच अवसायनात नोटीस विरोधात व मतदान हक्क संरक्षण मेळाव्यात ते बोलत होते. या प्राथमिक दूध संस्थांच्या हितासाठी सर्वच संचालकांनी एकत्रित  लढण्याचा निर्धार बोलून दाखविला. कोर्टातही दाद मागू असेही काही संचालक म्हणाले.

     गोकुळचे चेअरमन मुश्रीफ म्हणाले, गोकुळ दूध संघाशी संलग्न ११०८ दूध संस्थांचा अवसायन यादीत समावेश झाल्यामुळे जिल्ह्यातील हजारो दूध उत्पादक सभासदांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. अवसायन यादीत समाविष्ट झालेल्या बहुतांश संस्था कार्यरत असून नियमित दूध पुरवठा करीत आहेत. त्यांच्या लेखापरीक्षण प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत तसेच नियमानुसार निवडणुका देखील पार पडलेल्या आहेत. या संस्थांकडून दररोज सुमारे १ ते १.५ लाख लिटर दूध संकलन होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संस्था प्रतिनिधींनीही आपली भूमिका मांडताना अवसायन यादीतील बहुतांश संस्था कार्यरत असतानाही त्यांचा समावेश का करण्यात आला. दुग्ध विभागाने याचा गांभीर्याने विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.  संस्था प्रतिनिधी  विद्याधर कुलकर्णी, स्वामी समर्थ दूध संस्था बामणीचे युवराज पाटील, विठ्ठलाई देवी दूध संस्था कौलवचे केरबा पाटील, संभाजी खोत भुयेवाडी, विश्वासराव इंगवले हातकणंगले, दादू पाटील मरळी, आनंदा पाटील तळये खुर्द, शिवाजी शिंदे भुदरगड, विजय सरननोबत पन्हाळा, महादेव मोरे आजरा, गुरुनाथ शिंदे शाहुवाडी, राहुल शीरमोळे गडहिंग्लज, दिपक पाटील निवडे गगनबावडा,गणेश शिंदे शिरोळ, महालक्ष्मी महिला दूध संस्था बहिरेश्वर  संजीवनी बचाटे यांनी मनोगत व्यक्त केले.

या मेळाव्यास संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर,  शौमिका महाडिक, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतिश पाटील, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, सचिन घोरपडे, विकास पाटील उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes