Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
छत्रपती शिवराय, करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी रथोत्सव थाटातपतसंस्था फेडरेशनच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी  अरुंधती महाडिक ! खासदार धनंजय महाडिकांना सहकाररत्न पुरस्कार !!राज्यातील २५ बडया अधिकाऱ्यांच्या एकाचवेळी बदल्या, कोल्हापूरला तीन नवीन अधिकारीकार्तिकेयन एस यांची बदली, कोल्हापूर जिप सीईओपदी डॉ. जस्मिन के. मंजुलक्ष्मी यांची बदली, महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ. राजेंद्र भारुड अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी वर्षा सिंघण यांची तडकाफडकी बदलीमहापालिकेत नगरसेवक- अधिकाऱ्यांत खडाजंगी, आयुक्तांनी दिले कारवाईचे आदेशकेडीसीसी बँकेचा व्यवसाय २१ हजार ३७१ कोटींवर, ढोबळ नफा २८७ कोटीनालेसफाईचा सविस्तर कृती आराखडा दोन दिवसात सादर करा - राजेश क्षीरसागर मंत्री चंद्रकांत पाटील म्हणजे एक मुक्त विद्यापीठ, हसन मुश्रीफांची कोपरखळी

जाहिरात

 

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणजे एक मुक्त विद्यापीठ, हसन मुश्रीफांची कोपरखळी

schedule02 Apr 26 person by visibility 345 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी  : " उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणजे एक मुक्त विद्यापीठ आहे." अशी कोपरखळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावली.
 कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे गुरुवारी दोन एप्रिल 2026 रोजी पत्रकार परिषद आयोजित केली होती. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रगतीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद झाली . यावेळी पत्रकारानी, दोन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी  मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कणेरी मठ येथे केलेल्या विधानाकडे लक्ष वेधले. मंत्री पाटील यांनी "भारतामध्ये पूर्वी सुबत्तता  होती. देशात वैभव होते. देशात सोन्याचा धूर निघायचा. मात्र इंग्रजांनी व मुस्लिम राजवटीने तो लुटून नेला." असे विधान केले होते त्या विधानाकडे प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींनी मंत्री यांचे लक्ष वेधले. त्यावर मंत्री मुश्रीफ म्हणाले " मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर मी काही जास्त बोलणार नाही कारण चंद्रकांत पाटील म्हणजे एक मुक्त विद्यापीठ आहे "
 राष्ट्रवादीतील काही आमदार फुटण्याची शक्यता वर्तवली जात असल्याकडे लक्ष वेधले असता मंत्री मुश्रीफ म्हणाले  " राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष हा एकसंध आहे. अजित पवार यांच्या पक्षातील एकही आमदार कुठेही फुटून जाणार नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करत आहोत. राष्ट्रवादीचे आमदार फुटणार अशी वक्तव्य करणाऱ्या खासदार संजय राऊत यांनी स्वतःच्या पक्षाचे खासदार पहिल्यांदा सांभाळावेत "असा टोलाही त्यांनी लगावला.
 कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या बाराशे प्राथमिक दूध संस्थांच्या संदर्भात चौकशी करण्यासाठी द्विसदस्य समिती नेमल्याचे पत्रकाराने निदर्शनास आणल्यावर मंत्री मुश्रीफ म्हणाले, " ही चौकशी नियमित आहे. प्रक्रियेचा एक भाग असतो.  चौकशीत ज्या संस्था दोषी आढळतील त्या मतदानास अपात्र  ठरतील आणि ज्या संस्था योग्यरीत्या काम करत आहेत ते मतदानास पात्र ठरतील. गोकुळवर होणाऱ्या आरोपामागे अदृश्य  शक्ती कोण आहे? हे मला माहीत नाही. ज्यानी असे विधान केले आहे त्यांना ते ठाऊक असणार. "
[ यावेळी माजी आमदार संजय घाटगे, माजी आमदार राजेश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुरलेकर,  जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ए वाय पाटील, अर्जुन आबिटकर, विजयसिंह माने, सुधीर देसाई, भैय्या माने, रणजीत पाटील,   श्रुतिका काटकर, स्मिता गवळी आदी उपस्थित होते

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes