Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
छत्रपती शिवराय, करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी रथोत्सव थाटातपतसंस्था फेडरेशनच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी  अरुंधती महाडिक ! खासदार धनंजय महाडिकांना सहकाररत्न पुरस्कार !!राज्यातील २५ बडया अधिकाऱ्यांच्या एकाचवेळी बदल्या, कोल्हापूरला तीन नवीन अधिकारीकार्तिकेयन एस यांची बदली, कोल्हापूर जिप सीईओपदी डॉ. जस्मिन के. मंजुलक्ष्मी यांची बदली, महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ. राजेंद्र भारुड अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी वर्षा सिंघण यांची तडकाफडकी बदलीमहापालिकेत नगरसेवक- अधिकाऱ्यांत खडाजंगी, आयुक्तांनी दिले कारवाईचे आदेशकेडीसीसी बँकेचा व्यवसाय २१ हजार ३७१ कोटींवर, ढोबळ नफा २८७ कोटीनालेसफाईचा सविस्तर कृती आराखडा दोन दिवसात सादर करा - राजेश क्षीरसागर मंत्री चंद्रकांत पाटील म्हणजे एक मुक्त विद्यापीठ, हसन मुश्रीफांची कोपरखळी

जाहिरात

 

अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी वर्षा सिंघण यांची तडकाफडकी बदली

schedule02 Apr 26 person by visibility 694 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातील अपर जिल्हाधिकारी संजय शंकर शिंदे व जिल्हा पुनर्वसन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी वर्षा शिंगण यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. महसूल व वन विभागाचे उपसचिव महेश वरुडकर यांच्या सहीनिशी बदलीचे आदेश निघाले आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांची सध्याच्या कार्यरत पदावरुन एकतर्फी कार्यमुक्ती करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. श्रीमती सिंघण यांनी अपर मुख्य सचिव (महसूल, नोंदणी व मुद्रांक), महसूल व वन विभाग मंत्रालय येथे रुजू व्हावे  असे आदेश आहेत. अपर जिल्हाधिकारी शिंदे यानी अपर मुख्य सचिव महसूल व वन विभाग मंत्रालय येथे रुजू व्हावे असे आदेशात म्हटले आहे. गेली अनेक वर्षे एकाच जिल्ह्यात वेगवेगळया पदावर कार्यरत अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदली झाल्यामुळे तर्कवितर्क लढविले जात आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes