Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
छत्रपती शिवराय, करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी रथोत्सव थाटातपतसंस्था फेडरेशनच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी  अरुंधती महाडिक ! खासदार धनंजय महाडिकांना सहकाररत्न पुरस्कार !!राज्यातील २५ बडया अधिकाऱ्यांच्या एकाचवेळी बदल्या, कोल्हापूरला तीन नवीन अधिकारीकार्तिकेयन एस यांची बदली, कोल्हापूर जिप सीईओपदी डॉ. जस्मिन के. मंजुलक्ष्मी यांची बदली, महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ. राजेंद्र भारुड अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी वर्षा सिंघण यांची तडकाफडकी बदलीमहापालिकेत नगरसेवक- अधिकाऱ्यांत खडाजंगी, आयुक्तांनी दिले कारवाईचे आदेशकेडीसीसी बँकेचा व्यवसाय २१ हजार ३७१ कोटींवर, ढोबळ नफा २८७ कोटीनालेसफाईचा सविस्तर कृती आराखडा दोन दिवसात सादर करा - राजेश क्षीरसागर मंत्री चंद्रकांत पाटील म्हणजे एक मुक्त विद्यापीठ, हसन मुश्रीफांची कोपरखळी

जाहिरात

 

नालेसफाईचा सविस्तर कृती आराखडा दोन दिवसात सादर करा - राजेश क्षीरसागर

schedule02 Apr 26 person by visibility 55 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर :  पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच प्रमुख आणि लहान नाल्यांची १०० टक्के सफाई होणे आवश्यक आहे.  नालेसफाई आणि ड्रेनेज डक्ट सफाईचा सविस्तर कृती आराखडा दोन दिवसात सादर करावा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

 आमदार  क्षीरसागर यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत पूरप्रणव क्षेत्राची पाहणी केली. व पुढील २ दिवसांत नाले सफाईचा अ‍ॅक्शन प्लान (कार्य आराखडा) सादर करण्याचे आदेश दिले.

 आमदार  क्षीरसागर यांनी, शहरातील सर्व प्रमुख आणि लहान नाल्यांच्या सफाईसाठीचा सविस्तर कृती आराखडा २ दिवसांत महापालिका प्रशासनाने सादर करावा. नाले सफाईच्या कामात हलगर्जीपणा झाल्यास संबंधित वॉर्ड अधिकारी आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर थेट जबाबदारी निश्चित करण्यात येईल. नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री सज्ज ठेवण्यात यावी. पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व नाल्यांची शंभर टक्के सफाई पूर्ण करून सखल भागात पाणी साचणार नाही तसेच अवकाळी पावसासह आगामी पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचणार नाही याची दक्षता घेवून कामात पारदर्शकता ठेवा, अशा सूचना दिल्या. 

यावेळी महानगरपालिका उप आयुक्त परितोष कंकाळ, उप शहर अभियंता गुजर, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, आश्पाक आजरेकर , प्रशांत नलवडे, आदी उपस्थित होते. 
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes