Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सर्वात तरुण आमदार म्हणून कौस्तुभ गावडे यांना विधान परिषदेवर पाठवू ; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणसीईओंनी केले जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या कामकाजाचे कौतुक ! अभ्यासिकेची पाहणी! !बंडोबा झाले थंडोबा…!पदवीधरसाठी ४७ , शिक्षक मतदारसंघात तीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातगोकुळसाठी दोन्ही आघाड्यांना चिन्हांचे वाटप ! ठरावधारकांना रविवारपासून सहलीवर पाठवण्याचेही नियोजन !!पुणे पदवीधरमधून भैया मानेंची माघारकार्यकर्त्यांची गर्दी….ओसांडणारा उत्साह अन् सतेज पाटलांची शशिकांत पाटील चुयेकरांना चेअरमन करण्याची घोषणामान्यवरांशी संवाद, भेटीगाठीद्वारे कौस्तुभ गावडेंचा प्रचारावर भरमहायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीची घोषणा, नेते अन उमेदवारांच्या उपस्थितीत घोषणासमविचारी आघाडीतर्फे उमेदवारांची घोषणा, सात संचालकाना पुन्हा उमेदवारी

जाहिरात

 

कार्यकर्त्यांची गर्दी….ओसांडणारा उत्साह अन् सतेज पाटलांची शशिकांत पाटील चुयेकरांना चेअरमन करण्याची घोषणा

schedule09 Oct 26 person by visibility 74 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी -: व्यासपीठावर  विविध पक्षाचे नेते…पदाधिकाऱ्यांची लक्षणीय संख्या… कार्यकर्त्यांची गर्दी...ओसांडणारा उत्साह…  सतेज पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषणा अशा वातावरणात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांनी, गोकुळ निवडणुकीसाठी राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या पॅनेलची घोषणा केली…त्याचवेळी त्यांनी, ‘गोकुळ दूध संघात समविचारी आघाडीचे पॅनेल सत्तेत आल्यानंतर पहिले चेअरमन शशिकांत पाटील चुयेकर असतील. मागील वेळी त्यांना चेअरमन करायचं ठरलं होते. मांडव घातला होता. फटाकडया आणल्य. पेढे आणले होते. आता तो हटलेला मांडव,  फटाकडया आणि पेढे हे सारं स्वर्गीय आनंदराव पाटील यांना अभिवादन करण्यासाठी शशिकांत पाटील यांना चेअरमन करु ’अशी भावनिक सादप पाटील यांनी घातली. आणि पुन्हा एकदा सारा परिसर समविचारी आघाडीच्या विजयाच्या घोषणांनी दणाणला.

ताराबाई पार्क येथील आमदार पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालय येथे समविचारी आघाडीच्या उमेदवारांची नावे निश्चिती आणि घोषणा करण्यासाठी नेते मंडळी व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शेतकरी कामगार पक्षाचे नेते व माजी आमदार जयंत पाटील, माजी आमदार राजू आवळे, ऋतुराज पाटील, सत्यजीत पाटील, राजीव आवळे, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. शिवाय कार्यकर्त्यांनी अजिंक्यतारा परिसर गर्दीने फुलला होता. सायंकाळी ४.३० वाजता पत्रकार परिषद आयोजित केली होती. आमदार पाटील यांनी गोकुळसाठी समविचारी आघाडीच्या उमेदवारांची नावाची घोषणा केली. समविचारी आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना ठाकरे पक्ष व शेतकरी कामगार पक्षाला प्रत्येकी एक जागा दिली आहे.

उपस्थित नेतेमंडळींच्या हस्ते समविचारी आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. ‘गोकुळमध्ये सत्ता आल्यानंतर पहिल्याच महिन्यात पशुखाद्य दरात शंभर रुपयांची कपात, जातीवंत म्हैस खरेदीसाठी म्हशीच्या मूळ किंमतीच्या ७५ टक्के अनुदान, म्हैस दूध खरेदीत किमान पाच रुपये दरवाढ आणि गाय दुधासाठी किमान दोन रुपये दरवाढ’अशा घोषणा आमदार पाटील यांनी केल्या.  

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes