गोकुळसाठी दोन्ही आघाड्यांना चिन्हांचे वाटप ! ठरावधारकांना रविवारपासून सहलीवर पाठवण्याचेही नियोजन !!
schedule09 Oct 26 person by visibility 163 category
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीची जोरदार तयारी सुरू आहे. दोन्ही आघाड्याने पॅनल आणि उमेदवारांची घोषणा केल्यानंतर आता प्रचारावर भर देण्यात आला आहे महायुतीतर्फे रविवारी महासैनिक दरबार हॉल येथे प्रचार मेळावा आयोजित केला आहे तर महाविकास आघाडी प्रणित समविचारी आघाडीतर्फे स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या स्मारकाला अभिवादन करून रविवारपासूनच प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे. दोन्ही बाजूने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर सहलीचा बेत आहे. जास्तीत जास्त ठरावधारक आपल्या बाजूने राहावेत यासाठी नियोजन केले. ठरावधारकांना रविवारपासून सहलीवर पाठवण्याचे नियोजित आहे. जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक यांना सोबत पाठविले जाणार आहे. प्रत्येकांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये थेट लढत होत आहे. 25 जागेसाठी पन्नास उमेदवार रिंगणात आहेत. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीच्या पॅनेलला चिन्हांचे वाटप झाले. महायुतीच्या राजषीॅ शाहू शेतकरी विकास आघाडीला कपबशी हे चिन्ह मिळाले तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला शिट्टी हे चिन्ह मिळाले आहे.