लोहिया हायस्कूलमध्ये ग्रंथामधून उभारली ज्ञानाची गुढी
schedule19 Mar 26 person by visibility 34 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील नामांकित शाळा अशी ओळख असलेल्या सौ.स.म.लोहिया हायस्कूल येथे गुढीपाडव्याच्यामुहूर्तावर नवीन प्रवेश प्रक्रिया सकाळी ८ ते १ या वेळेत अत्यंत उत्साही वातावरणात पार पडली. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते सागर बगाडे यांच्या संकल्पनेतून शाळेच्या प्रांगणात ‘ज्ञानाची गुढी’ उभारण्यात आली. भारतीय संविधानासह सुमारे ४० अनमोल ग्रंथांच्या आधारे ही गुढी साकारण्यात आली, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित झाले. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत भेटवस्तू देऊन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून संस्था सचिव प्रभाकर हेरवाडे, सहसचिव एस. एस. चव्हाण, प्रभारी प्राचार्य रत्नाकर घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी पर्यवेक्षक बी. एस. चोपदार, डी. एस. पाटील, जिमखाना प्रमुख सचिन शिंदे, कलाशिक्षक अनिल अहिरे, अमोल जाधव, दीपक कुंभार, शांतीनाथ भिवशीकर, आर. डी. कुलकर्णी, राजू गोसावी, एम.एम.माने, पी. ए.परीट, जे.एस.कोळी, एम.आर.कोळी, संगीता गुरव उपस्थित होते.