Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळमध्ये महायुतीची सत्ता म्हणता, अहवालात जिल्ह्यातील एकाही भाजपच्या नेत्यांचा फोटो का नाही ?आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान समितीत अमल महाडिककोल्हापुरात गणेश विसर्जनाची १८ तास जल्लोषी मिरवणूकमहाडिक गटाच्या दूध उत्पादक सभासदांची बैठक, शौमिका महाडिक सोमवारी भूमिका स्पष्ट करणारनोकर भरतीच्या आरोपावरुन सुनील एडकेंचे राजमोहन पाटलांना चॅलेंज, माफी मागण्यासाठी उद्यापर्यंतची दिली मुदत चेअरमनांनी त्यांच्या कोटयातील जागा शिरोळच्या नेत्याला दिली, त्यांचा नातेवाईक बँकेत नोकरीला-राजमोहन पाटीलमाझा मुलगा-भाचा- पुतण्याला बँकेत नोकरीला लावणार नाही- चेअरमन शिवाजीराव रोडे-पाटीलशिक्षक बँकेच्या सभेला गोंधळाचे ग्रहण, एकमेकांच्या उणीदुणीवरुन खडाजंगी ! विरोधकांचा सभात्याग, सत्ताधाऱ्यांची मोठी घोषणा !!गणेश विसर्जन मिरवणुकीत नेत्यांचा हटके अंदाज ! लेझीम नृत्य, साऊंड सिस्टीमवर ताल अन् कार्यकर्त्यांसोबत फेर !!भुयेवाडीत सर्व रोग निदान शिबिर, आयुष्यमान कार्ड वाटप

जाहिरात

 

पालकमंत्र्यांचा उद्योजकांशी संवाद, उद्योगांसाठी जागा- कुशल मनुष्यबळसाठी लवकरच बैठक

schedule06 Sep 25 person by visibility 67 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘सरकार विविध स्तरावर कोल्हापूरच्या विकासासाठी खर्च करत आहे. उद्योजक आणि उद्योग जगत हे रोजगार निर्माण करणारे आहेत. त्यामुळे चांगल्या सुविधा मिळायला हव्यात.   उद्योग विस्तारासाठी जागा आणि कुशल मनुष्यबळसाठी आपण विशेष प्रयत्न करू. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर बैठक घेवू.’ अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांनी दिली.

कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशन येथे ते बोलत होते. याप्रसंगी त्यांच्या हस्ते, गणपतीची आरती झाली.   इंजिनिअरिंग असोसिएशनतर्फे उद्योजकांनी, औद्योगिक क्षेत्रासाठी जागा, कुशल मनुष्यबळ मिळणे, मोठे उद्योग कोल्हापूरात येणे,आयटीआय मध्ये फौंड्री कोर्स असे विषय माांडले. पालकमंत्री आबिटकर म्हणाले, ‘ कोल्हापूरच्या उद्योग विश्वाला एक वेगळे महत्व आहे त्यामुळे हा भाग विकसित आणि विस्तारीत झाला पाहिजे. येथील बरीच मुले पुण्या-मुंबईला जातात त्यामुळे येथील उद्योगांना कुशल मनुष्यबळ कमी पडते.  कोल्हापूर जिल्हयात विविध आयटीआय आहेत त्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ वाढवू,  कुशलता वाढविण्यासाठी सरकार निधी देत आहे.  आयटी पार्कसाठीही सरकार सकारात्मक दुष्टीने काम करत आहे.’

इंजिनीअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांनी असोसिएशनची माहिती दिली. त्यांच्या हस्ते, मंत्री आबिटकर यांचा शाल, श्रीफळ, गणपतीची चांदीची फोटो फ्रेम देवून सत्कार करण्यात आला. असोसिएशनचे सचिव प्रदीप व्हरांबळे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी माजी आमदार जयश्री जाधव, असोसिएशने संचालक श्रीकांत दुधाणे, कुशल सामाणी, प्रसन्न तेरदाळकर, संजय अंगडी, दिनेश बुधले, नितीन वाडीकर, सचिन मेनन, बाबासो कोंडेकर, अतुल आरवाडे, हर्षद दलाल, अमर करांडे, सुरेन्द्र जैन, शांताराम सुर्वे, स्वरूप कदम, पृथ्वीराज कटके, संगीता नलवडे, विशाल मंडलीक, अशोकराव जाधव,आनंद पेंडसे, सुभाष माने, नंदकुमार नलवडे, संजय थोरवत,ओंकार पोळ,चोरग, प्रशांत मोरे, प्रविण कोठावळे, राम कुंभार, भगवान माने उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes