थकीत भत्त्यासाठी शिक्षकांचा शुक्रवारी महापालिकेसमोर शंखध्वनी
schedule16 Feb 26 person by visibility 55 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : महानगरपालिकेची निवडणूक होऊन एक महिना पूर्ण झाला तरी निवडणुकीसाठी कार्यरत असणाऱ्या राखीव कर्मचाऱ्यांचा भत्ता आजअखेर मिळालेला नाही. गुरुवारपर्यंत हा भत्ता न मिळाल्यास शुक्रवारी महानगरपालिकेसमोर शंखध्वनी आंदोलन करण्याचा इशारा महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे यांनी दिला आहे. उपायुक्त पारितोष कंकाल यांनी निवेदन स्वीकारले.
भत्ता तात्काळ मिळावी यासाठी महासंघाच्यावतीने दोन वेळा निवेदन देऊनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. निवडणुकीसाठी राखीव कर्मचारी म्हणून नियुक्त कर्मचारी, पोस्टल मतदानासाठी नियुक्ती केलेले कर्मचारी, मतमोजणीसाठी नियुक्त केलेले कर्मचारी, यांच्यासह आशा सेविका व बी.एल.ओ.यांनाही मानधन मिळालेले नाही.
गुरुवार पर्यंत या मानधन देण्याबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता कोल्हापूर महानगरपालिका समोर खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ तसेच सर्व राखीव कर्मचारी, व मानधन न मिळालेले कर्मचारी यांच्यासह शंखध्वनी आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.