Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
उच्चांकी गर्दी, अठरा कोटींची उलाढाल ! भीमा कृषी प्रदर्शनाचा रेकॉर्ड!!आता विश्रांती नाही, गोकुळची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवणार - सतेज पाटील थकीत भत्त्यासाठी शिक्षकांचा शुक्रवारी महापालिकेसमोर शंखध्वनी आरटीई 25 टक्के अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया कोरेंच्या  उपस्थितीत चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान, जनसुराज्य व भाजप म्हणजे दोन शरीर- एक आत्मातात्यासाहेब कोरे डिप्लोमाच्या २१ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवडजिल्हा परिषदेत मोठा भाऊ कोण ? भाजप - राष्ट्रवादीत भाऊबंदकी, अध्यक्षपदावरुन घासाघीस ! !तारा भवाळकर, भास्कर पेरे,अशोक रोकडेंना पुरस्कार ! बुधवारी वितरण समारंभ ! !राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूलमध्ये पत्रकारांचा सत्कारअकरा किलोचा भोपळा ! दहा किलोचा कोहळा सुरण, एक किलोचे वांगे! !

जाहिरात

 

उच्चांकी गर्दी, अठरा कोटींची उलाढाल ! भीमा कृषी प्रदर्शनाचा रेकॉर्ड!!

schedule16 Feb 26 person by visibility 39 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  : येथील भीमा कृषी प्रदर्शनामध्ये यंदा गर्दीचा उच्चांक झाला तसेच गेल्या चार दिवसांमध्ये प्रदर्शनात एकूण 18 कोटींची उलाढाल झाली. प्रदर्शनात किशोर वसंत चव्हाण मुंबई कांदिवली यांचा पाच फुटाचा इगवाना सरडा हा बेस्ट ऑफ द शो ठरला आहे. तर श्री कुलदीप सिंह बळीराम लाड रा माळसोना ता,जिल्हा परभणी यांचा लाल कंधारी वळू हा चॅम्पियन ऑफ द  शो ठरला आहे.

 या प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, " शेतकऱ्यांच्या उत्पादनाला दीडपट करण्याची क्षमता एआयमध्ये  आहे. शहरातील सुविधा ग्रामीण भागात मिळाल्या तर लोकांचे स्थलांतर थांबेल आणि शेतीची प्रगती होईल." पाटील यांनी धनंजय महाडक यांनी कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व्यासपीठ उभे केल्याचे सांगितले.

 पालकमंत्री आबिटकर यांनी खासदार धनंजय महाडिक दरवर्षी शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन भरवतात आणि नवनवीन माहिती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतात या प्रदर्शनाचा लाभ अनेक शेतकरी घेतात. मात्र शेतकऱ्यांनी याचा उपयोग आपल्या शेतीसाठी करून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पादनावर भर देणे आवश्यक असल्याचे सांगितले. 

       खासदार  महाडिक यांनी गेली १८ वर्ष भीमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीची माहिती दिली जात आहे. परिपूर्ण असे प्रदर्शन भरविले जात आहे. कृषी प्रदर्शनात रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती असे सांगितले. इचलकरंजी महापालिकेचे महापौर  उदय धांतुडे, उपमहापौर अनिल डाळ्या यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
 आमदार अशोकराव माने,शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे,  भाजपाचे राहुल चिकोडे, महेश जाधव,  बी न्यूज चे कार्यकारी संचालक पृथ्वीराज महाडिक, भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक आदींची  उपस्थिती होती.  मेरी वेदर मैदानावर १३ ते १६ फेब्रुवारी भरविण्यात आलेल्या भीमा कृषी प्रदर्शनाच्या चारही दिवशी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी लहान मुलांसह आबालवृद्धांसह शेतकऱ्यांचा आणि लोकांचा झाला होता गर्दीचा उच्चांक. पाच फूट सरडा आणि एकाच मैदानावर  तेरा वेळा रेकॉर्ड केलेला हिंदकेसरी हरण्या बैल,अन्य जनावरे पाहण्यासाठी शेतकऱ्यांसह लोकांनी प्रचंड गर्दी चार दिवस केली होती.शतकवीर हिंदकेसरी शर्यतीमधील हरण्याबैल, तीन वर्षाची राधा गाय,मारवाडी जातीचा स्टेलियन गब्बर नावाचा काळा रंगाचा घोडा,३५० किलोचे डुक्कर १२० आणि ९० किलो वजनाचे बोकड,३३ इंचाचा घोडा,एक टनाचा लाल कंधारी बैल,मुरा रेडे,१० डझनाचा केळी घड,११ किलोचा भोपळा,१० किलोचा कोह

चार दिवसात सुमारे १५  कोटींची उलाढाल ही झाली.तर तिला बचत गटाच्या माध्यमातून २५ लाखाची उलाढाल झाली. बेगम राजू मुजावर यांनी बिर्याणी मधून १ लाख १० हजार रुपये विक्री केली, अमृता उमेश भोकरे यांनी १ लाख रुपयाचे मासे विकले तर ज्योती धावडे यांनी ५४ हजार ७०० रुपयांची विक्री केली. कल्याणी भिमगोंडा यांनी ४२ हजार रुपयांचे वस्तू विकल्या. या सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला. तर प्रगतशील शेतकरी सर्जेराव धनवडे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.किशोर वसंत चव्हाण मुंबई कांदिवली यांचा पाच फुटाचा इगवाना सरडा हा बेस्ट ऑफ द शो ठरला आहे. तर श्री कुलदीप सिंह बळीराम लाड रा माळसोना ता,जिल्हा परभणी यांचा लाल कंधारी वळू हा चॅम्पियन ऑफ द  शो ठरला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes