सन्मानाच्या दिनीच शिक्षक रस्त्यावर ! जुनी पेन्शनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा !!
schedule05 Sep 26 person by visibility 55 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ' एकजुटीचा एकच मंत्र जुनी पेन्शन आमचं अस्त्र, एकच मिशन - जुनी पेन्शन, जुनी पेन्शन आमच्या हक्काचे- नाही कुणाच्या बापाचे, कर्मचाऱ्यांचे घामाचे दाम- जुनी पेन्शन हाच आमचा ध्यास' अशा आशयाचे हाती फलक आणि डोक्यावर 'एकच मिशन -जुनी पेन्शन' असा मजकूर दिलेली टोपी परिधान करत जिल्ह्यातील हजारो शिक्षक आणि शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चामध्ये ना कोणत्या घोषणा... ना कुणाचा जयजयकार, मात्र शिक्षकांच्या मूक हुंकारातून जुनी पेन्शनचा आवाज उमटला. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालय येथे मूक मोर्चाचे रूपांतर सभेत झाले तत्पूर्वी शिक्षक संघटनांच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले नायब तहसीलदार नम्रता शिराणे यांनी निवेदन स्वीकारले.
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन योजना समन्वय संघातर्फे या मोर्चाचे आयोजन केले होते आमदार जयंत आसगावकर, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, शिक्षक नेते दादासाहेब लाड, भरत रसाळे, खंडेराव जगदाळे, बाबासाहेब पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने, कागलच्या नगराध्यक्ष सविता माने, बी जी बोराडे मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पवार मुख्याध्यापक संघाचे माजी चेअरमन सुरेश संकपाळ, माजी सचिव दत्ता पाटील, प्रचार दत्तात्रय घुगरे, मीनल पाटील, महानंदा घुगरे, विजय शिरोळकर, सुधाकर निर्मळे , मदन निकम आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाकडे निवेदन दिले. तत्पूर्वी दसरा चौक येथून मूक मोर्चाला सुरुवात झाला मोर्चाच्या अग्रभागी महिला शिक्षक होत्या. तोंडावर काळा रंगाचा मास्क आणि काळ्या किती लावून शिक्षक मोठ्या संख्येने मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, बसंत बहार रोड ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघाला. एक नोव्हेंबर 2005 पूर्वी कायम सेवेत व नियमित श्रेणी असलेल्या राजभरातील 26000 शिक्षकांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी लढा सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यात या पेन्शनसाठी 1900 शिक्षक संघर्ष करत आहेत. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन योजना समन्वय संघातर्फे या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाची हाक देण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या सभेमध्ये सरकारने जुनी पेन्शन योजने संदर्भात सकारात्मक निर्णय घेतला नाही तर 28 सप्टेंबर 2026 पासून आझाद मैदान येथे बेमुदत आंदोलन पुकारले केले जाईल तसेच येत्या पुणे विभागीय शिक्षक व पदवीधर मतदार संघावर ही बहिष्कार टाकू असा इशारा या सभेतून देण्यात आला' ' खरे तर, पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन. शिक्षकांच्या सन्मानाचा दिवस. मात्र सरकार व प्रशासनाकडून शिक्षकांच्या मागण्या मान्य होत नाहीत या कारणास्तव शिक्षकांना सन्मानाच्या दिवशीच रस्त्यावर उतरावे लागत आहे.' अशा भावना सभेत म्हटल्या
प्रशासनाला दिलेल्या निवेदनावरती शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांच्यासह मुख्याध्यापक संघाचे सचिव आर वाय पाटील, मिलिंद पांगिरेकर, रवींद्र मोरे, श्रीकांत पाटील, संजय पाटील, बी डी साळवी, उदय पाटील, अजित रणदिवे, प्रकाश पाटील, शांताराम तौंदकर, एम आर पाटील, मुकुंद कुंभार, जयसिंग पवार ळ, राजेंद्र सूर्यवंशी, जयसिंग पाटील, आर जे पाटील, पोपट पाटील, मारुती मुरुडकर, मनोहर जाधव, संजय पाटील, के आर पाटील, काका पाटील, बी टी पाटील, अशोक हुबळे, दीपक पाटील, जितेंद्र म्हैशाळे , बबन इंदुरकर ,अनिल चौगुले, निवास ताम्हणकर, मच्छिंद्र नाळे, आर पी चौगुले, सुरेश जाधव, मनोहर पाटील, जीवन पाटील, आदींच्या सह्या आहेत आंदोलनात जिल्ह्यातील विविध भागातील शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यामध्ये राजेंद्र कोरे संतोष आयरे, रंगराव तोरस्कर राजेंद्र रानमळे, पंडित पवार राजेंद्र सूर्यवंशी , मुख्याध्यापिका सुप्रिया भोसले , डी एल नंदीवाले , संजय उगले आदींचा सहभाग होता दरम्यान शिवसेनेच्या वैद्यकीय पक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे व प्रा. बापूसाहेब अडसुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे येऊन शिक्षकांच्या मागण्याला पाठिंबा दिला. माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला.