आयुक्तांच्या कार्यालयातच शारंगधर देशमुख - आदिल फरास एकमेकांना भिडले ! चौकात कार्यकर्ते जमले, पोलिसांचा हस्तक्षेप- नेत्यांची फोनाफोनी!!
schedule01 Sep 26 person by visibility 764 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : महापालिकेत महायुती म्हणून एकत्र असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते यांच्यातील वाद मिळण्याऐवजी दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. मंगळवारी 1 सप्टेंबर 2024 रोजी आयुक्त राजेंद्र भारूड यांच्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीतच शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख व राष्ट्रवादीचे गटनेते आदिल फरास यांच्यामध्ये पुन्हा एकदा खडाजंगी झाली. दोघांनीही एकमेकांना अ बघून घेण्याची भाषा वापरली. तसेच शड्डू ठोकत खाली चौकात येण्याची भाषाही केली. यामुळे महापालिकेतील वातावरण चांगलेच तापले या दोन्ही गट नेत्यांमध्ये वाद झाल्याचे काही वेळातच कार्यकर्त्यांना समजले दोघांच्याही कार्यकर्त्याने महापालिका चौकात गर्दी केली. यामुळे तणावात आणखीनच भर पडली अखेर पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना चौकातून पांगवले.
शिवसेनेचे गटनेते देशमुख व राष्ट्रवादीचे गटनेते फरास यांच्यातील वाद हा पदाधिकारी निवडीपासून सुरू आहे परिवहन समिती सभापती निवडीवरून दोघांच्या मध्ये पहिल्यांदा ठेंगे पडली त्यानंतर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ही दोघांनीही एकमेकांना उद्देशून एकेरी भाषा वापरली. एकमेकांना आव्हान देताना चौकात उतरण्याची भाषा ही केली सभागृहातील अन्य नगरसेवक पदाधिकाऱ्याने दोघांच्यामध्ये मध्यस्थी करत हा वाद मिटवला होता. मंगळवारी पुन्हा हा वाद उफाळून आला. वृक्ष प्राधिकरण संदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत दोघांच्यामध्ये खजंडागी उडाली. दोघांनीही एकमेकांना उद्देशून एकेरी भाषा वापरली. तसेच अंगावर धावून जाण्याचा प्रकारे घडल्याचे सांगितले जाते एकमेकांना बघून घेण्याची व चौकात खाली ये अशी भाषा वापरल्यामुळे तणाव आणखीनच वाढला. या दोघांमध्ये वाद घडल्याचे कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनीही महापालिका चौकात गर्दी केली दोन्ही बाजूचे कार्यकर्ते त्यामुळे तणाव आणखीन वाढला पोलिसांना या प्रकाराची माहिती समजतात तत्काळ ते महापालिका चौकात दाखल झाले. त्यांनी कार्यकर्त्यांना चौकातून पांगवले. दरम्यान या साऱ्या प्रकाराची महायुतीच्या नेते मंडळींनी गंभीर दखल घेतली आहे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक यांनी नगरसेवक देशमुख व नगरसेवक फरास यांना फोन करून सूचना केले आहेत