ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. नीला सोनटक्के यांचे निधन
schedule17 Jul 26 person by visibility 70 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील ज्येष्ठ विधीज्ञ नीला रामचंद सोनटक्के यांचे शुक्रवारी पहाटे (17 जुलै 2026 ) वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 84 वर्षांच्या होत्या. जुन्या पिढीतील कोल्हापूर न्यायालयातील ज्येष्ठ वकील म्हणून त्या ओळखल्या जात. त्यांचे आजोबा दत्तात्रय सोनटक्के हे छत्रपती शाहू महाराज संस्थानात न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. तर वडील कै. रामचंद्र सोनटक्के हेही न्यायाधीश होते. हाच वारसा नीला सोनटक्के यांनी जपला. दक्षता समितीच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्ष कायदेशीर तज्ञ म्हणून काम केले. विविध मासिके, दिवाळी अंक, वृत्तपत्रातून कायदेविषयक लिखाणही त्यांनी केले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच कोल्हापूर वकील संघटनेच्या वृत्तीने श्रद्धांजली वाहण्यात आली. देहदान करून ॲड. नीला सोनटक्के यांनी एक नवा आदर्श घालून दिला आहे.