पृथ्वी अजित मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर
schedule17 Jul 26 person by visibility 145 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासन अधिकारी पृथ्वी अजित मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (18 जुलै 2026) आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज येथील शिक्षण महर्षी प्राचार्य एम आर देसाई ग्रंथालय सभागृहामध्ये सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे. या अंतर्गत रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. तसेच बीपी, शुगर, अस्थमा, दातांची तपासणी व डोळे तपासणी मोफत करण्यात येणार आहे. इको इसीजी तपासणी सवलतीत केले जाणार आहे. या आरोग्य तपासणी शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे. दरम्यान मोफत आरोग्य तपासणी निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात सहभागी रक्तदात्यांचा विमा उतरविण्यात येणार आहे. तसेच त्यांना आकर्षक भेट वस्तू दिली जाणार आहेत. सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. गरजू रुग्णांना रक्तासाठी धावाधाव करावी लागू नये यासाठी रक्तदान शिबिर आयोजित केले आहे या शिबिरामध्ये रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.