Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
रविवारी सेट परीक्षा, कोल्हापूर परिसरात २६ सेंटरची सुविधावाढदिवसाच्या समारंभाला विधायक कार्याची जोड , विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला वह्यांचा सुगंधशाळा बंद पाडणारा मार्च २०२४ चा संचमान्यतेचा जीआर रद्द करा, कोल्हापुरात शिक्षकांचे जोरदार आंदोलन मुंबईतील जसलोक हॉस्पिटलच्या धर्तीवर सीपीआरचा कायापालट- मंत्री हसन मुश्रीफमुंबईतील सिद्धिविनायकच्या प्रसादसाठी पुन्हा गोकुळ तुपाची पसंती !राहुल रेखावारांच्या विरोधात कोल्हापुरात निदर्शने, शिक्षक संघटना कारवाईसाठी आक्रमकसतेज पाटील यांच्या वाढदिवसाला जमलेल्या वह्यांचे शनिवारी वाटपधनजंय महाडिकांच्या कृष्णराजला हटके शुभेच्छाआता धुमशान मिनी मंत्रालयसाठी, प्रभार रचना करण्याचे आदेश !कोल्हापुरात ढगफुटी, वीज कोसळली ! शहर जलमय, पाण्यात मुलगा वाहून गेला !!

जाहिरात

 

स्वंयसिद्धा-व्ही. टी. पाटील फाऊंडेशनचे पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण समारंभ

schedule12 Jun 25 person by visibility 46 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील सौ. सरोजिनीदेवी विश्वनाथ विश्वस्त मंडळ कोल्हापूर संचलित स्वयंसिद्धा संस्थेचा ३३ वा वर्धापनदिन आण्ि डॉ. व्ही. टी. पाटील फाऊंडेशनचा ३१ वा वर्धापनदिनानिमित्त रविवारी (१५ जून २०२५) गौरव सोहळा आयोजित केला आहे. याप्रसंगी संस्थेतर्फे विविध पुरस्कार वितरण करण्यात येणार आहेत. तसेच कै. कांचन परुळेकर यांच्या जीवनावर आधारित माहितीपट प्रदर्शित करण्यात येईल. गायन समाज देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे रंगमंदिर येथे दुपारी तीन वाजता कार्यक्रम होणार आहे अशी माहिती स्वयंसिद्धाच्या कार्यकारी संचालिका जयश्री गायकवाड आणि फाऊंडेशनच्या अध्यक्षा  सौम्या तिरोडकर यांनी पत्रका परिषदेत दिली.

यंदा, डॉ. शोभना तावडे मेहता आरोग्यम धनसंपदा पुरस्कार कोल्हापुरातील डॉ. मोहिनी अशोक कुलकर्णी यांना तर कै. मधुकर सरनाईक परिवर्तन दूत पुरस्कार तिळवणी येथील संजय गणपती काशीद यांना जाहीर झाला. कै. जिनेंद्र शिरोळकर स्मरणार्थ गुरुवर्य पुरस्कार सोंडोली येथील शिक्षक एम. आर. पाटील यांना तर कै. माई तेंडुलकर स्मरणार्थ मातृ-पितृ देवो भव पुरस्कार तारदाळ येथील अलका सुर्यवंशी व प्रल्हाद सुर्यवंशी यांना जाहीर झाला. कै. राजीव हुजुरबाजार स्मरणार्थ जीवन सारथी पुरस्कार कोल्हापुरातील शितल जिवंधन वणकुद्रे यांना मिळाला. दहा हजार रुपये व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. कै. विभावरी आपटे पुरस्कार कोल्हापुरातील जानकी हसन मोकाशी यांना मिळाला. रोख बारा हजार व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

शेडशाळ येथील गोकुळ महिला बचत गटाला राजलक्ष्मी पुरस्कार मिळाला. कै. माणिकताई जामसांडेकर महिला सबलीकरण प्रकल्प पुरस्कारांनी आराधना राहुल भंडारे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. कै. स्मिता कोरगावकर पुरस्कार चिकोडी येथील गौरी मांजरेकर यांना तर मीना सामंत यांच्या देणगीतून परिवर्तन दूत पुरस्कार सावंतवाडीतील संदीप श्रीधर सावंत यांना जाहीर झाला आहे. कै. नलिनी मधुकर महाजन यांच्या स्मरणार्थ जिद्दी उद्योजिका पुरस्कार अर्चना तानाजी माळी (बावची-वाळवा) यांना दिला जाणारा आहे. रोख पाच हजार रुपये व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पत्रकार परिषदेला अंजली घोरपडे,  नीता नोताणी, सुमन बारामतीकर, आशा थोरवत, नीता दटमजगे, मीना ठक्कर, वैशाली चौगुले, सुजाता नाईक, कविता बडडे, प्रीती साळोखे आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes