Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सतेज चषक फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ ! प्रॅक्टिस क्लब, वेताळमाळ तालीम विजयी !!छत्रपती शिवराय, करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी रथोत्सव थाटातपतसंस्था फेडरेशनच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी  अरुंधती महाडिक ! खासदार धनंजय महाडिकांना सहकाररत्न पुरस्कार !!राज्यातील २५ बडया अधिकाऱ्यांच्या एकाचवेळी बदल्या, कोल्हापूरला तीन नवीन अधिकारीकार्तिकेयन एस यांची बदली, कोल्हापूर जिप सीईओपदी डॉ. जस्मिन के. मंजुलक्ष्मी यांची बदली, महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ. राजेंद्र भारुड अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी वर्षा सिंघण यांची तडकाफडकी बदलीमहापालिकेत नगरसेवक- अधिकाऱ्यांत खडाजंगी, आयुक्तांनी दिले कारवाईचे आदेशकेडीसीसी बँकेचा व्यवसाय २१ हजार ३७१ कोटींवर, ढोबळ नफा २८७ कोटीनालेसफाईचा सविस्तर कृती आराखडा दोन दिवसात सादर करा - राजेश क्षीरसागर

जाहिरात

 

सतेज चषक फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ ! प्रॅक्टिस क्लब, वेताळमाळ तालीम विजयी !!

schedule04 Apr 26 person by visibility 48 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  : सतेज चषक फुटबॉल स्पर्धेला शनिवारपासून (चार एप्रिल 2026 ) सुरुवात झाली. सामन्याच्या पहिल्याच दिवशी वेताळ तालीम मंडळ विरुद्ध उत्तरेश्वर प्रसादिक वाघाची तालीम मंडळ व प्रॅक्टिस क्लब फुटबॉल संघ विरुद्ध  मर्दानी खेळाचा आखाडा तालीम मंडळ या संघात सामना झाला. या सामन्यात वेताळ तालीम मंडळ संघाने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ संघावर तीन विरुद्ध शून्य गोल फरकाने विजय मिळवला. या सामन्यात वेताळमाळ तालमीचा खेळाडू आकाश माळी हा सामनावीर ठरला. वेताळमाळ तालीमकडून सर्वेश वाडकर, आकाश माळी, अभिषेक सावंत यांनी गोल केले.
  पाटाकडील तालीम मंडळ व डॉ. डी वाय पाटील ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे.रम्यान विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण,  महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजीत बोंद्रे, जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील, गोकुळचे संचालक  बाबासाहेब चौगुले, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, शिवसेना ठाकरे पक्षाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले, नगरसेवक प्रवीण केसरकर,  अर्जुन माने,   अमर समर्थ, संजय मोहिते,  दुर्वास कदम,  प्रतिज्ञा उत्तुरे, स्वीकृत नगरसेवक सुनील मोदी, राहुल माने, बाजार समिती संचालक सुयोग वाडकर, माजी नगरसेवक ईश्वर परमार, रमेश पुरेकर, आपचे संदीप देसाई,  शिक्षक नेते भरत रसाळे, तौफिक मुल्लानी, डॉ भरत कोटकर, पाटाकडील तालीम मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष संदीप सरनाईक, फुटबॉल प्रशिक्षक शरद माळी, संपत जाधव, निवास जाधव बाळासाहेब निचिते,  बाळासाहेब चौगुले, दीपक चोरगे, गणेश विचारे, कमलेश शिंदे, तुषार देसाई, सिद्धेश्व हावळ, तुषार घाटगे, विवेक दळवी, अक्षय शेळके, श्रीधर गाडगीळ, शरद माळी, आदी उपस्थित होते. दरम्यान प्रॅक्टिस फुटबॉल क्लब व मर्दानी खेळाचा आखाडा तालीम मंडळ यांच्यातील सामना दुपारी झाला. या सामन्यात प्रॅक्टिस फुटबॉल क्लबने एकतर्फी विजय मिळवला. प्रॅक्टिस फुटबॉल क्लब मर्दानी खेळाचा आखाडा तालीम मंडळ या संघावर सात विरुद्ध शून्य गोल फरकाने मोठा विजय मिळवला. प्रॅक्टिस फुटबॉल क्लबकडून अजिंक्य नलावडे ने तीन गोल केले. रोहित भोसलेने दोन गोल केले सागर चिले व साहील डाकवे यांनी प्रत्येकी एक गोल केला. या सामन्यात प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचा खेळाडू हा सामनावीर ठरला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes