ग्रामीण जीवन समृद्ध करण्यात आनंदराव पाटील -चुयेकरांचा मोठा वाटा : चेअरमन नविद मुश्रीफ
schedule07 Apr 26 person by visibility 60 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘. कोल्हापूर जिल्ह्यातील गावोगावी धवलक्रांती निर्माण करून गोकुळच्या माध्यमातून ग्रामीण जीवन समृद्ध करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या आचार-विचारांवरच गोकुळची भविष्यातील वाटचाल सुरू राहील,’असे उद्गगार गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी काढले.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने (गोकुळ), ताराबाई पार्क येथील विकास कक्ष कार्यालयात गोकुळचे शिल्पकार माजी चेअरमन स्वर्गीय आनंदराव ज्ञानदेव पाटील-चुयेकर यांची ८८ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व संचालक यांच्या हस्ते आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
चेअरमन मुश्रीफ यांनी, गोकुळ दूध संघाच्या उभारणी व वाटचालीत स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांचे मोलाचे योगदान आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांप्रती असलेली त्यांची तळमळ व त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय यामुळेच गोकुळ आज यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. १९६३ मध्ये अवघ्या ७०० लिटर दूध संकलनापासून सुरू झालेल्या गोकुळ दूध संघाने आज २० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा गाठला आहे.’असे नमूद केले. ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी मनोगत व्यक्त केली.
डॉ.एम.पी.पाटील यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी संचालक युवराज पाटील, संभाजी पाटील, बाळासो खाडे, संचालिका अंजना रेडेकर, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंके, संकलन व्यवस्थापक दत्तात्रय वागरे, डॉ. प्रकाश दळवी, धनाजी पाटील, के.डी.आमते, बाजीराव मुडूकशिवाले, अशोक पुणेकर, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील उपस्थित होते.